पुणे राजमुद्रा दर्पण। एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. एमपीएससी आयोगने अवकाळी पावसामुळे एमपीएससी गट ब च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावर 2 डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार होती. एमपीएससीनं याबाबत एक अधिकृत परीपत्रक तयार करण्यात आले.
एमपीएससी आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय करीता पुणे व कोल्हापूर केंद्रावर मुलाखत आणि शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. 1 व 2 डिसेंबर रोजी शारीरिक चाचणी तर 2 डिसेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र आता अवकाळी पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन वेळा PSI पदाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम ढकलण्यात आलाय.