• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आम्ही भारताचे लोक” या विषयावरील उत्तम कांबळे यांचे व्याख्यान संपन्न…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 7, 2021
in जळगाव
0
“आम्ही भारताचे लोक” या विषयावरील उत्तम कांबळे यांचे व्याख्यान संपन्न…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत भवन येथे संविधान जागर समिती व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही भारताचे लोक” या विषयावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक, विचारवंत पत्रकार उत्तम कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

“मी पणाने राष्ट्र तयार होत नाही,  राष्ट्र आम्ही म्हणूनच तयार होत असते”. ज्या दिवशी जाती जन्माला आल्या त्या दिवशी राष्ट्र मरण पावले. जाती मुळेच मी पणा वाढीस लागतो म्हणून आम्ही भारताचे लोक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार हिच देशाची खरी ताकद आहे.  बाबासाहेब आंबेडकरांनी दैववादाला पराभूत केले आहे. मात्र संविधानाला हळद-कुंकू लावून दैवीकरण करण्याचा प्रयत्न अज्ञानातुनच केला जातो. मानवी कल्याण सांगणाऱ्या संविधाना बाबत साक्षरता होण्याची गरज आहे असे परखड विचार श्री. उत्तम कांबळे यांनी व्याख्यानातुन व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकूंद सपकाळे यांनी केले. विचार  मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंतीताई दिघे, प्रा.मिलिंद बागुल, अमोल कोल्हे, ईश्वर मोरे, किशोर सूर्यवंशी, दिलीप सपकाळे, रमेश सोनवणे, भारत ससाणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे बापूराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंदन बिऱ्हाडे, जगदीश सपकाळे,  महेंद्र केदारे, वाल्मिक सपकाळे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, आकाश सपकाळे, बाबुराव वाघ, युवराज सुरवाडे आदिंनी परिश्रम घेतले.

Tags: jalgaonmukund sapkaleuttam kambade
Previous Post

12 ते 16 जानेवारी दरम्यान अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचे आयोजन…

Next Post

जळगाव महानगरपालिकेत विविध पदावर मोठी भरती…जाणून घ्या

Next Post
जळगाव महानगरपालिकेत विविध पदावर मोठी भरती…जाणून घ्या

जळगाव महानगरपालिकेत विविध पदावर मोठी भरती...जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!