बीड राजमुद्रा दर्पण । पुणे पोलिसांच्या सायबर ब्रँचने लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यामधील ५ आरोपी आहे. यात लातुर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय-५०), रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, बीड, डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय- ३६), रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, बीड, उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय- ३६), रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड, शाम महादू म्हस्के (वय- ३८), रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड, राजेंद्र पांडुरंग सानप (वय-५१), रा. शामनगर, बीड अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन सायबर ब्रँच कडून तपास सुरू आहे. काल रात्री मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.