• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जावयाचा केला गंधर्व विवाह ; जळगाव येथील ॲड. संजय राणे व कुटुंबाचा आदर्शवत निर्णय!!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 13, 2021
in जळगाव
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : मागील वर्षी कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे अनेकांना नातेवाईक व आप्तेष्ट गमवावे लागलेत. बहुतांश जणांचे संसार अर्ध्यावर मोडले. या आघातातून काही कुटुंबे सावरू लागली आहेत. नव्याने संसाराची उभारणी होत आहे. अशा फेरजुळणीत एक आदर्शवत गंधर्व विवाहविधी गुरूवारी, दि.९ ला वरणगाव (ता. भुसावळ) येथे पार पडला.कोरोना संसर्गामुळे विवाहित कन्येला गमावणाऱ्या पालकांनी जावई व दोन नातींचे कुटुंब पुन्हा फुलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जळगाव येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ व भोरगांव लेवा पंचायतीचे कुलसचीव ॲड.संजय राणे यांचे थोरले बंधू मिलिंद मनोहर राणे (रा. अहमदाबाद) यांची कन्या सौ. कोमल हिचा विवाह अहमदाबाद येथील सुजीत दिलीप महाजन यांच्याशी झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गामुळे सौ. कोमल हिचे दि. ३ मे २०२१ ला निधन झाले. स्व. सौ. कोमल व सुजीत यांना उर्वि व चार्वी अशा दोन मुली आहेत. त्या दोघी लहान आहेत. स्व. सौ. कोमल ही सातवीत असताना पासून तिचे संपुर्ण शिक्षण हे आजोबा एम. डी. राणे, आजी स्व. पुष्पलता व काका ॲड. संजय व किरण राणे यांच्याकडे जळगावला झाले. तिचे लग्नही त्यांच्या पुढाकाराने सुजीत यांच्याशी जुळले होते. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र कोरोनाच्या आपत्तीने संसाराला दृष्ट लागली.

स्व. सौ. कोमलच्या अकाली निधानानंतर जावाई आणि नातींचे कुटुंब अधुरे झाले. सुजीत यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी ॲड. संजय राणे यांनी कुटुंबात पुढाकार घेतला. ॲड. संजय राणे हे भोर पंचायतीचे कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. ते पंचायतीच्या सर्व कार्यात सहभागी होतात. अनेकांचे दुरावलेले वा घटस्फोटीत संसार ते पुन्हा जुळवतात. ॲड. संजय राणे यांनी सुजीत यांचा दुसरा विवाह करण्याचे सूचविले. जेष्ठ बंधु मिलिंद व उद्योजक किरण राणे व सुजीत यांचे वडील दिलीप महाजन व आजोबा एम. डी. राणे यांनीही हा विचार उचलून धरला. सुजीत हे सुद्धा तयार झाले.

ॲड. संजय राणे व कुटुंबियांनी सुजीत यांना मुलगा मानून त्यांचा दुसरा विवाह जुळवायला प्रयत्न सुरू केले. परिचितांमधून नशिराबाद (ता. जळगाव) येथील विनोद रोटे यांची कन्या लिनाचे स्थळ समोर आले. लिना घटस्फोटीता आहे. ती सुद्धा दुसऱ्या विवाहास तयार होती. अखेर राणे-महाजन कुटुंबियांच्या संमतीने रितसर विवाह जुळणी झाली. सुजीत व लिनाचा गंधर्व विवाह गुरूवार, दि. ९ रोजी पार पडला. या विवाहाकडे आदर्शवत आणि अनुकरणीय पाऊल म्हणून पाहता येते. जुन्या परंपरा मोडून कुटुंब पुन्हा फुलविण्याचा राणे,महाजन व रोटे कुटुंबाचा हा प्रयत्न समाज परिवर्तनाचा नवा माईलस्टोन रोवणारा असून समाजासमोर आदर्श घडविणारा आहे.

Tags: jalgaonrane pariwarshubh vivah
Previous Post

जळगावातील गांधी मार्केट येथील तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी..!

Next Post

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

Next Post

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!