• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे सेवेला सुरुवात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 13, 2021
in जळगाव, धुळे, राजकीय
0
Spread the love

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्लीहून ऑनलाइन, तर

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव येथून दाखविला हिरवा झेंडा

            जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.

याशिवाय खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार उन्मेश पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            चाळीसगाव येथे झालेल्या कार्यक्रमास धुळेचे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रेल्वेचे विभागीय प्रबंधक एस. एस. केडिया, सहाय्यक प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ सुरक्षा अधिकारी श्री. गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. दानवे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासन प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. नवीन रेल्वे सेवा, मार्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्यात येत आहेत. महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा महत्वाकांक्षी सोलापूर- जळगाव रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. रेल्वे सेवा व अन्य मार्गांसाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. 

            दरम्यान चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे दीर्घकालावधीनंतर सुरू झाली. यामुळे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रेल्वेला फुलांनी सजविण्यात आले होते. या नवीन गाडीच्या स्वागतासाठी चाळीसगावसह धुळेकरांनी गर्दी केली होती. मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर राज्यमंत्री श्री. सत्तार यांच्यासह रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चाळीसगावपासून भोरस रेल्वेस्थानकापर्यंत प्रवास केला

Tags: bjpdhule-chalisgoan memu trenjalgaon jilha loksabhakha. unmesh patil
Previous Post

जावयाचा केला गंधर्व विवाह ; जळगाव येथील ॲड. संजय राणे व कुटुंबाचा आदर्शवत निर्णय!!

Next Post

जैन इरिगेशनतर्फे १२ डिसेंबरला आदर्श शेतकरी, आदर्श गृहिणी पुरस्कार

Next Post

जैन इरिगेशनतर्फे १२ डिसेंबरला आदर्श शेतकरी, आदर्श गृहिणी पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!