• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांसारखी खिलाडूवृत्ती
प्रत्येक माणसात असायला हवी : राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 16, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

  • राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे प्रतिपादन
  • भुसावळात राष्ट्रवादी चषक कबड्डी स्पर्धेत जिल्ह्य़ातील 28 संघ सहभागी

भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. त्यांच्याकडे जशी खिलाडूवृत्ती आहे तशी प्रत्येकाकडे असायला हवी. जय पराजयाची ते चिंता करीत नाहीत. लढणे हा त्यांचा स्थायीभाव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळात केले.

भुसावळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी चषक जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा (पुरुष गट) आयोजित केलेल्या आहेत. जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात उद्घाटन सत्रात माजी महसूलमंत्री खडसे हे बोलत होते. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ध्वजारोहण तर उद्योजक राजेश राका यांनी क्रीडांगण पुजन केले. फाउंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे निवृत्त मुख्य अभियंता आर. आर. बाविस्कर, अशोक लाडवंजारी, अनिल जैन, प्रा. डॉ. सुनील नेवे, हुस्नोद्दीन समशोद्दीन, दिलीप खंडेलवाल, सार्थक चोपडा, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, शेख शफी, वसंत पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार, जळगाव कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह नितीन बरडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जय गणेश फाऊंडेशन चे समन्वयक गणेश फेगडे यांनी केले. स्पर्धेत जिल्ह्य़ातील 28 संघ सहभागी झाले आहेत. दोन दिवस डे-नाइट हे सामने होत आहेत. जय गणेश फाऊंडेशनचे अध्यक्ष धीरज धांडे, सचिव तुषार झांबरे, जय गणेश स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष नीलेश कोलते, कार्याध्यक्ष चैत्राम पवार यांच्यासह 25 मंडळांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

शरद पवारांकडील खिलाडूवृत्ती आदर्श
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. प्रत्यक्ष न खेळताही भल्याभल्यांना ते गारद करतात. लढणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. जय-पराजयाची ते तमा बाळगत नाहीत. क्रिकेटपेक्षा ते देशी खेळांना अधिक प्राधान्य देतात. भुसावळात राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंनी कबड्डी या देशी खेळाच्या स्पर्धा आयोजित करून मोलाचा संदेश दिला आहे, अशा शब्दांत नेमाडेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

पहिल्या दिवशी रंगलेले सामने…
जळगावच्या क्रीडा रसिक संघाने भुसावळच्या जय मातृभूमी संघाचा तर जळगावच्या महर्षी वाल्मिक संघाने चाळीसगाव येथील कै. वसंतराव नाईक संघाचा पराभव केला. दोन्ही सामने रंगतदार झाले. रात्री उशिरापर्यंत चुरशीचे सामने सुरू होते.

Tags: eknath khadsejalgaonjalgaon jilhajalgaon ncpmaharashtrashrad pawar
Previous Post

महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे कर्ज माफीचे 63 दिवसीय आंदोलन खासदारांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित

Next Post

बारी समाजाच्या वधू-वर पुस्तिकेचे प्रकाशन

Next Post

बारी समाजाच्या वधू-वर पुस्तिकेचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!