• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मार्वल कॅफेवर कारवाईचे वृत्त प्रसारीत करणार्‍या जेष्ठ पत्रकाराला धमकी ; राज्य पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 27, 2021
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा – शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅ फेवर पोलिसांची कारवाई केल्याची बातमीचे वृत्त हटवावे अशी अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी धमकी फोनवरुन दोन जणांनी इंडिया आपतक चॅनल जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धमकी देणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सर्व पत्रकारांनी सोमवार, २७ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहे.

शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅ फेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून त्याठिकाणी अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॅ फेत दोन युगल देखील मिळून आले. संबंधित क फे चालकावर कारवाई देखील करण्यात आली. संबंधित प्रकरणाची माहिती आणि अधिकार्‍यांची प्रतिक्रिया असलेले वृत्त इंडिया आपतक चॅनलने प्रसारित केले होते. तदनंतर संपादक आनंद शर्मा यांना सदर व्हिडीओ वृत्त हटविणे संदर्भात किंवा कारवाई करण्याची धमकी देणारे दोन फोन मोबाईल क्रमांक +९१८८०६३०१५०० (पहिला फोन) व +९१८८५६०६१३२२ (दुसरा फोन) यावरून आले होते. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे ते वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ज्या नंबर वरून पत्रकारांना धमक्या देण्यात आले त्या फोन क्रमांकांची तसेच व्यक्तींची सखोल चौकशी करून संबंधित कॅफे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण सपकाळे, जळगाव शहराध्यक्ष कमलेश देवरे, चंद्रशेखर नेवे, वाल्मिक जोशी, जकी अहमद, विजय वाघमारे, विजय पाटील, जुगल पाटील, बंटी थोरात, वाहेद काकर, धर्मेंद्र राजपूत, वसीम खान, चेतन वाणी, जितेंद्र कोतवाल, अय्याज मोहसीन, रजनीकांत पाटील, अनिल केराले, किशोर पाटील, भूषण हंसकर आदी पत्रकार उपस्थित होते.

Tags: jalgaonjalgaon cityjalgaon polismaharashtra rajya patrkar sangh
Previous Post

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भायुमो अयोध्या नगर मध्ये कोविड लसीकरण शिबीर

Next Post

भाजप समर्थकांच्या अवैध धंद्याना राष्ट्रवादी काँग्रेसच मुक समर्थन ; प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप

Next Post

भाजप समर्थकांच्या अवैध धंद्याना राष्ट्रवादी काँग्रेसच मुक समर्थन ; प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!