• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त का.क.केंद्र पिंप्राळातर्फे कार्यक्रमात मान्यवरांचा सन्मान सोहळा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 27, 2022
in जळगाव
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा दर्पण : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र,पिंप्राळाच्यावतीने दि.२४ ते २६ जानेवारी २०२२ पर्यंत मराठी भाषा संवर्धन हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियमावलीचे पालन करत हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात आले.

या कार्यक्रमात दि. २४ जानेवारी २२ रोजी मराठी भाषेतील अभिजात ग्रंथ दासबोध, मोरोपंत लिखित “केकावली”, भगवदगीता यांचा परिचय तर दि. २५ जानेवारी २२ रोजी कवितावाचन व रसग्रहण कार्यक्रमात* स्वातंत्र्यवीर सावरकर, शांता शेळके, ग. दि.माडगूळकर, भा.रा.तांबे, बालकवी, माधव ज्युलियन, श्रीकांत मोघे या नामवंत कवींच्या कविता स्पष्टीकरणासह कविता वाचन करण्यात आले. त्यानंतर दि. २६ रोजी प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रात कार्य करुन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या मराठी भाषिक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यात रोहिणी अग्निहोत्री (तत्वज्ञान आणि अध्यात्म), अशोकजी कोतवाल (ललित लेखन व काव्यलेखन), योगेश शुक्ल (वृत्तपत्र , सोशल मीडिया लेखन), विनोदजी ढगे (लोककला,पथनाट्य), राजेश उपासनी (कविता लेखन), प्रफ्फुल आवारे (कामगार कवी, समाज कार्य), तृप्ती जाधव (पाटील) (शिक्षण व सांस्कृतिक), मोरेश्वर सोनार (कथा,कविता,नाट्य), जितेंद्र कुवर (कथा,कविता लेखन), योगिता संजय पवार (आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन) आदी मान्यवरांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक करताना कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर यांनी मराठी भाषेचे मातृभाषेसह राजभाषा म्हणून महती स्पष्ट करताना या भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या यशस्वी मराठी भाषिक मान्यवरांचा सत्कार करणे हे कामगार कल्याण मंडळाकरिता अभिमानास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार केंद्रसंचालक नरेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनिता पाटील, जागृती मोरे, आशा चव्हाण व अनिल कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Tags: jalgaonkamgar mandal maharashtrasahitya purskar
Previous Post

आयडीआय बँकेच्या एटीएममधल्या १३ लाखांच्या रकमेवर दरोडा

Next Post

जि. प. प्राथ. शाळा, वरगव्हाण येथे प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

Next Post

जि. प. प्राथ. शाळा, वरगव्हाण येथे प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!