• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनतर्फे एसटी कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी वाटप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 27, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | – कोरोनाकाळासह संकटसमयी तसेच नेहमीच जळगावकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे एसटी महामंडळाच्या 200 कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी याउपक्रमांर्तगत सुमारे महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.


कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर नितीन लढ्ढा, बांधकाम व्यावसायीक अनिष शहा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थित होते. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनतर्फे सुरू असलेल्या कोरोना काळासह विविध समाजपयोगी कार्याची माहिती दिली. जैन उद्योग समूहाव्दारे गरजुंची भोजनाची व्यवस्था असो की, शहरातील कोणतेही समाजपयोगी कार्य असो जैन उद्योग समूह नेहमी अग्रेसर असतो. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या दातृत्व भावनेतुन स्नेहाची शिदोरी हा उपक्रम सुरू असुन आवश्यकता असणाऱ्यांसाठी तो अपेक्षापूर्तीचा ठरत असल्याचे नितीन लढ्ढा म्हणाले. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो मात्र संघर्षाच्या काळात मदतीचा हात देणारे खरे औदार्याचे धनी असतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील यांनी आपल्या व्यथा व्यक्त करताना अशोक जैन यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार होत नसल्याने संभाव्य उपासमारीचे गांभीर्य सांगितले त्यानुसार त्यांनी तत्काळ मदतीचा हात दिल्याचे विजय पाटील कृतज्ञतापुर्वक म्हणाले. या एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची मोफत नेत्रतपासणी करण्याची घोषणा यापुर्वीच केली आहे. जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जैन इरिगेशनचे अनिल जोशी यांनी स्नेहाची शिदोरी या उपक्रमाविषयी अवगत करत आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सहकारी यांनी सहकार्य केले.


फोटो कॕप्शन स्नेहाच्या शिदोरी वाटपाप्रसंगी एसटी महामंडळाचे कर्मचारी सोबत (डावीकडून) विजय पाटील, अरविंद देशपांडे, नितीन लढ्ढा, अनिष शहा, अनिल जोशी.

Tags: ashok jainjain irrigationjalgaon jilhast karmchari
Previous Post

नेहरु युवा केंद्र व समिधा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने अभिनव कार्यशाळा संपन्न भडगाव येथे संपन्न

Next Post

आघाडी शासन शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत ढकलत आहे- गिरीश महाजन

Next Post

आघाडी शासन शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत ढकलत आहे- गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!