• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गांधीतीर्थ’ सर्वांसाठी प्रेरणास्थान
-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 28, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा – जैन हिल्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या गांधी धाममध्ये बापूंचे जीवन चित्रित केलेले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गौरवोदगार काढले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थ ला भेट दिली. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते.


संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधी तीर्थ पोहचवित आहे. जगातील सुप्रसिद्ध अशा ऑडिओ गाईडेड म्युझियम खोज गांधीजी की या संग्रहालयास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी राज्यपाल महोदयांचे सुतीहार देऊन स्वागत केले. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते.
गांधी तीर्थ साकारतांना भवरलालजी जैन यांनी शेती, माती, पाणी आणि शेतकरी तसेच देशाचा, तरुणाईच्या भल्याचा विचार केला. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी तीर्थची निर्मिती केली. या माध्यमातून युवाशक्ती, तरुणांबद्दल तसेच ग्रामविकास, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याबाबत ते सदैव प्रयत्नशील होते. त्यादृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे निर्मिती उद्दीष्टाचे कार्य आजदेखील प्रभावीपणे होत आहे.
0000

Tags: . mahavikas aaghadigandhi tirthjalgaonrajya pal bhagatsing koishyari
Previous Post

राज्यपालांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध ; पदाधिकारी कार्यकर्त्यांची धरपकड

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे
मराठी स्वाक्षरी मोहीम संपन्न ;
शेकडो नागरिकांनी केली मराठीत स्वाक्षरी..

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे
मराठी स्वाक्षरी मोहीम संपन्न ;
शेकडो नागरिकांनी केली मराठीत स्वाक्षरी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!