• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविडचा रुग्ण वेळेत ओळखला जाण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 29, 2021
in महाराष्ट्र, शासकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | “कोविडचा रूग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे. त्याच्यापासून त्याचं कुटुंब वाचवलं पाहिजे, त्याला तर वाचवलंच पाहिजे पण त्याचा कुटुंबीयांना होणारा संसर्ग रोखला पाहिजे. अनावश्यक औषधांचा अतिरेकी वापर ही एक मोठी डोकेदुखी होते म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर या गोष्टी होता कामा नये.” असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अधिक खबरदारी घेणं गरजेचं असल्याचंही सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “माझं मत आहे की कोविडचा रूग्ण वेळेत ओळखला गेला पाहिजे. त्याच्यापासून त्याचं कुटंबं वाचवलं पाहिजे, त्याला तर वाचवलंच पाहिजे पण संसर्ग हा त्याचा कुटुंबीयाना होता कामा नये. कारण, आता जी तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, ती लहान मुलांमध्ये येईल का? येईल ना येईल हा अंदाज आहे. पण लहान मुलांमध्ये कोणाच्या मार्फत येईल? जसं पहिल्या लाटेत आपण सांगत होतो की मी सुरक्षित तर माझं कुटुंबं सुरक्षित. साहाजिकच आहे पहिल्या लाटेच्या वेळी करोनाबाधितांपासून ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका अधिक होता. तसं जर आता वयाचा अनुमान लावला तर करोनाबाधित कुंटुंबातील एकजण असेल, तर त्याच्यापासून मुलांना करोना संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याल करोना होऊ न देणं. आपण करोनापासून दोन हात लांब राहणं. हे सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे.”

तसेच, “काही वेळा गरज नसतानाही रूग्ण रूग्णालयात जातो व काही वेळेला गरजेचं असतानाही तो उशीरा जातो आणि विलंबामुळे मग तो दगावतो. या दोन्ही गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत. तसेच, अनावश्यक औषधांचा अतिरेकी वापर ही एक मोठी डोकेदुखी होते. जास्त काळासाठी स्टेरॉईड देणं व इतर औषधं देणं हे टाळलं गेलं पाहिजे. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर या गोष्टी होता कामानये.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

याचबरोबर “पावसाळा सुरू झाल्यानंतर इतर जे आजार उद्भवणार याबाबत देखील उपचार करताना, काय सावधानाता बाळगायला हवी, हे लक्षात घेऊन तुम्हाला ती उपचार पद्धती अवलंबावी लागणार आहे. आतापर्यंतचा जो अनुभव आहे त्यानुसार ज्याला सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) आहे, त्याच्यावर या विषाणूचा जास्त घातक दुष्परिणाम होतो. अशावेळी त्याची सहव्याधी लक्षात घेऊन उपचार केले पाहिजे. या कोवडिसाठी आपल्याकडे काही औषधी येत आहेत. परंतु त्यांचे दुष्परिणाम कशावर होतील? याचा देखील विचार केला गेला पाहिजे. ” असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Tags: coronacovid 19maharashtramaharashtra medical councilmukhyamantriuddhav thakre
Previous Post

सोनू जलान बेटिंग प्रकरणाला नवे वळण

Next Post

सूडबुद्धीने आरोप करत माझी व मविआची बदनामी केली जात आहे – मंत्री अनिल परब

Next Post

सूडबुद्धीने आरोप करत माझी व मविआची बदनामी केली जात आहे - मंत्री अनिल परब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!