• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 4, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण – सामाजिक समता मंच रावेर व प्रकाशवाट मित्रपरिवार चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील अल्पबचत भवन सभागृहात माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली .

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे व उदघाटक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ सूर्यवंशी हे होते .
विद्यार्थ्यांनी सर्वंकष परिवर्तनासाठी समाजात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक ग्रंथांचे चिंतन करून समाजात विचार पेरण्याचे काम करून समतावादी समाज निर्मितीसाठी परिश्रम घ्यावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात मुकुंदभाऊ सपकाळे यांनी आवाहन केले . विचार मंचावर सामाजिक समता मंचचे अध्यक्ष राजू भाऊ सवर्णे , उमेश गाढे , अमोल कोल्हे , सरपंच सचिन बिऱ्हाडे , प्रा. संजय साळवे , दिलीप सपकाळे , वाय एस महाजन , प्रा विजय गोसावी , सिद्धार्थ तायडे , सुनीता तायडे , उद्योजक विशाल देवरे उपस्थित होते . या वक्तृत्व स्पर्धेमध्ये 60 विद्यार्थ्यांना सहभागी झाले . राष्ट्र निर्मितीसाठी युवकांची भूमिका या विषयावर अतिशय परखड मत मांडुन अश्विनी शिंदे यांनी 7000 रुपये रोख व प्रमाणपत्र स्मृती चिन्हासह प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले ,

तर सर्वांगीण क्षेत्रात महिलांची झेप याविषयावर जागतिक आणि भारतीय स्तरावरील महिलांचे क्रांतिकारक योगदान विशद करत नेहा शिंदे यांनी 5000 रूपये रोख प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हासह द्वितीय क्रमांकाचे बक्षीस घेतले , महात्मा फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व याविषयावर आधुनिक भारतातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व नमूद करून हेमलता शिसोदे यांनी 3000 रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे बक्षीस मिळवले . सायली महाजन , रोशन पाटिल , तपस्वी गवळी , भूमिकेत सोनवणे , जान्हवी चौधरी , गौरव पाटिल , सरोजिनी जैन यांना उत्तेजनार्थ 500 रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतीचिन्हाचे वितरण करण्यात आले .

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश गाढे यांनी तर सुत्रसंचलन नगीन इंगळे व आभार प्रदर्शन भीमराव कोचुरे यांनी केले . वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण मा. सुरेश ठाकूर , प्रा. सतिष अहिरे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक समता मंच , रावेर व प्रकाशवाट मित्रपरिवार , चोपडा यांच्यासह शुभांगी माळी , पूजा गुजराथी , घनश्याम माळी , शुभम रावते यांनी परिश्रम घेतले .

Tags: 14 aprildr babasaheb aambedakarjalgaon
Previous Post

धक्कादायक : बोदवड तहसीलदारांसह तलाठी एसीबीच्या जाळ्यात ; महसूल प्रशासन हादरले..

Next Post

स्वतःला यशस्वी करण्यासाठी स्वतः मध्ये अनुशासन आणलेच पाहिजे : कुलगुरू डॉ विजयकुमार माहेश्वरी

Next Post

स्वतःला यशस्वी करण्यासाठी स्वतः मध्ये अनुशासन आणलेच पाहिजे : कुलगुरू डॉ विजयकुमार माहेश्वरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!