• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वकल्याणा साठी आयोजित
“विश्वशांती दौड”ला जळगावकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 10, 2022
in Uncategorized, जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती तर्फे महावीर जन्मकल्याणाक निमित्त रविवार, दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नवली चौक जळगाव येथून “विश्वशांती दौड” आयोजित केली होती. भगवान महावीर (जयंती) जन्म कल्याणक पर्वाचे औचित्य साधुन वर्तमानात प्रभु महावीर यांचे अहिंसा, सत्य हे शाश्वत विचारच जगात शांतता आणी सद्भाव प्रस्थापित करू शक़तील, हा महत्वाचा विचार घेवून ह्या “विश्वशांती दौड” चे आयोजन करण्यात आले होते.


“विश्वशांती दौड” भाऊंचे उद्यान- आकाशवाणी चौक- स्वतंत्र स्वतंत्र चौक- चिमुकले राम मंदिर- स्वतंत्र चौक- आकाशवाणी चौक मार्गे काव्यरत्नवली चौक येथे समाप्त झाली. सहभागी झालेल्या नागरिकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


विश्वशांती दौडला मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या वेळी महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, माजी महापौर नितिन लड्ढा, करीम सालार, जन्मकल्याणक समीती अध्यक्ष स्वरूपकुमार लुंकड़, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक युवासेना सहसचिव विराज कावडीया, विशाल चोरडिया, जयआनंद ग्रुप व युवाशक्ति फाउंडेशनचे सदस्यगण उपस्थित होते.

भवरलाल अँड कांताई जैन फाऊंडेशन तर्फे प्राप्त रोपटे देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.युवक, कार्यकर्ते, महिला सदस्या आदींनी परिश्रम घेतले.

ह्या अभिनव विश्वशांति दौड मध्ये डॉ प्रशांत देशमुख, किरण बच्छाव, अविनाश काबरा, विक्रांत सराफ, ववेक पाटील, प्रेमलता सिंग, वेदंती बच्छाव, डॉ भूषण झवर, कविता पाटील, गुरुप्रसाद तोतला, डॉ राहुल महाजन, डॉ तुषार कोठावदे, विद्या बेंडाळे यांच्यासह जळगावच्या विविध संघटना, मंडळ, रनिंग गृप्स, महिला, युवा व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सर्व रनर्स साठी पेयजल आणी शरबत वितरित करण्यात आले.

जीवदया संस्कार उपक्रम अंतर्गत पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीचे पात्र (परळ) निशुल्क वितरित केले. सोबत पशुपक्षी साठी करुणा भाव रोपण करण्याच्या उद्देशाने जीतो लेडीज विंग- महावीर ज्वेलर्स तर्फे पशुपक्षी खाद्य सामग्री चे पकिट मोफत वितरित करण्यात आले जेणेकरून जीवदया संस्कार समृद्ध होतील. सूत्र संचलन गिरीश वि. कुलकर्णी यांनी केले.
सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती – २०२२ तर्फे उत्स्फूर्त सहभागासाठी समस्त जळगावकरांचे विशेष आभार.

Tags: jain samajjalgaonmahavir jayntivishv shanti daoud
Previous Post

युवासेनेतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम करीत राम नवमी साजरी

Next Post

केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

Next Post

केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!