• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 11, 2022
in जळगाव
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा दर्पण – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सांघिक बुध्दिबळ स्पर्धा प्रेसिडेंट कॉटेज सुरू आहेत.


जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे.
सकाळच्या फेरी अखेर महिला गटात ८ गुणांसह विमानतळ प्राधिकरण चा संघ आघाडीवर तर पुरुष गटात विमानतळ प्राधिकरण व रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ‘ ब ‘ संघ ९ गुणांसह संयुक्त रित्या आघाडीवर.


सकाळी झालेल्या महिलांच्या ४ फेरीत पहिल्या पटावर विमानतळ प्राधिकरण च्या अर्पिता मुखर्जी व आर वैशाली ने अनुक्रमे आंध्रा राज्य संघाच्या निहारिका व कोटेपल्ली साई निरुपमा यांचा पराभव करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली तर दिव्या व प्रियांका यांनी सहजरीत्या बरोबरी स्वीकारत ३-१ ने संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या पटांवरील सामने कमालीचे एकतर्फी झाले पेट्रोलियम स्पोर्ट्स च्या सौम्या स्वामिनाथन ने अंजली सागर यांच्या राजावर आपल्या मोहऱ्यांनी अचूक हल्ला चढवत राजाला जेरीस आणले, पांढऱ्या उंटाची एफ ७ प्यादाला मारण्याची युक्ती अंजली सागर यांना न उमगल्याने त्यांचा राजा विचित्र कोंडीत सापडला पणसौम्याच्या उंट व घोडा वजीराच्या समन्वयाचा अंदाज न आल्याने त्यांना शरणागती पत्करावी लागली.


बाकी मानांकित खेळाडूंच्या सहज विजयामुळे पेट्रोलियम स्पोर्ट्सने गुजरात राज्य संघाचा ४-० असा पराभव करीत आपले आव्हान जिवंत ठेवले
उद्या होणाऱ्या महिलांच्या पाचव्या फेरीत विमानतळ प्राधिकरण ओडिशा राज्य संघाबरोबर तर पेट्रोलियम संघ महाराष्ट्र अ संघांसोबत समोरासमोर भिडतील.
पुरुष गटातील पाचव्या फेरीतील सामन्यांमध्ये कडवी लढत पहावयास मिळत असून पहिल्या पटावर रेल्वे अ संघाने विमानतळ प्राधिकरण संघाला चांगलेच झुंजवत सर्व पट अनिर्णीत राखण्यास यश मिळवले.
अरविंदने दिपेन चक्रवती सोबत खेळताना कारो कान बचाव पद्धतीचा अवलंब केला पण दिपेन ने डावाच्या सुरवातीलाच एच ३ चाल खेळत अरविंद ला बुचकळ्यात पाडले, अरविंद ने आपले दोन्ही घोडे सी ४ व ब ६ वर मजबूत बसवल्यामूळे त्याच्याकडे डावाच्या मध्यभागी वरचष्मा होता पण दिपेन ने योग्य वेळी खेळलेल्या ए ४ प्यादाच्या चालीमुळे, मोहोऱ्यांची मारामारी करणे अरविंद ला क्रमप्राप्त झाले व लवकरच दोन्ही खेळाडूंनी बरोबरी स्वीकारली.
दुसऱ्या पटावर रेल्वे च्या ब संघाने तामिळनाडू संघाचा ३-१ ने पराभव करीत, पुढील फेरीसाठी पहिल्या पटावर कूच केले.
तिसऱ्या पटावरील संघांमध्ये सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्या संघाने आक्रमक खेळ करीत महाराष्ट्र क संघाचा पराभव २.५- १.५ ने पराभव करीत ८ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.


पाचव्या फेरी अखेर विमानतळ प्राधिकरण व रेल्वे ब संघ ९ गुणांसह संयुक्त रित्या पहिल्या स्थानावर असून
सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड व रेल्वे अ संघ ८ गुणांसह द्वितीय स्थानावर आहेत.
सायंकाळच्या पुरुष गटांतील सहाव्या फेरीत अरविंद चिदंबरम चा विमानतळ

प्राधिकरणाचा संघ रेल्वेच्या ब संघाबरोबर पहिल्या पटावर भिडणार असून, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड दुसऱ्या पटावर रेल्वे च्या अ संघाबरोबर भिडणार आहे.

Tags: jalgaonrashtriy budhi bal spardha
Previous Post

केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

Next Post

Live : जळगावात समृद्ध महिला संकल्प परिषदेतून शरद पवार लाईव्ह..

Next Post

Live : जळगावात समृद्ध महिला संकल्प परिषदेतून शरद पवार लाईव्ह..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!