मुंबई राजमुद्रा दर्पण | बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत पडत, धडपडत, समोर आलेल्या संकटाला सामोरे जाऊन अखेर तिने आपली प्रसिद्धी मिळवली. अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत बहुतांश विभागात नशीब झळकवणारी कंगना आज अशा वळणावर आली आहे, ते पाहून तिला खरंच राणी म्हणावं लागेल, अशी चाहत्यांची प्रतिक्रिया आहे.
आगामी ‘धाकड़’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त असणाऱ्या कंगनाच्या घरी नव्या पहूनीचे आगमन झाले आहे. ही नवी पाहुनी कोण? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चला तर मग पाहूया…
काळ्या रंगातील मर्सिडीज ही कार कांगणाच्या घरची कुटुंब सदस्य आहे. एका इन्स्टा अकाऊंटवरून कंगनाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इथे ती आणि तिच्यासोबत कुटुंबातील काही मंडळी मोठ्या कौतुकाने या कारकडे पाहताना दिसत आहेत.
कांगणाने खरेदी केलेल्या मर्सिडीज मेबॅक कार जवळपास 5 कोटी किमतीची आहे. याआधीही कंगनाकडे बऱ्याच महागड्या कार आहेत. मेबॅकच्या रूपाने त्यात आणखी मोठी भर पडली आहे, आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असतानाच कंगनाच्या घरात ही नवी पाहुणी आलि… लाखामोलाची नव्हे तर, करोडोची ही पाहुनी अर्थातच कंगनाची आवडती असणार आहे यात प्रश्नच नाही…


