• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका : या दिवशी मान्सूनची हजेरी…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | मुंबईकरांसाठी खुशखबर ! मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका… 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात धडकणार, तर 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत मान्सून बरसणार.

10 जूनपर्यंत मुंबईत पावसाला सुरुवात होते. मात्र यावर्षी पाऊसाचे आगमन लवकर होणार असून, मान्सूनचा प्रवास उत्तम. आहे. 3 ते 9 जूनदरम्यान मान्सूनचे राज्यात एन्ट्री होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याबरोबरच 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पाऊस बरसेल असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रापर्यंत चांगली वाटचाल केलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी मात्र दोन्ही समुद्रात कोणतीही प्रगती न करता विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातही पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी झाला असला तर पुढील तीन-चार दिवस कोकण वगळता इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात अनेक भागात गेली दोन-तीन दिवस पूर्वमोसमी पाऊस झाला. कोकणात मात्र 25 मेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात 25 मेनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे देशात उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांत पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिणेकडील केरळ आणि तमिळनाडूमध्ये काही भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फळबागा झोपल्या असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

देशातील उत्तरेकडील भागात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब ये भागांमध्ये जोरदार पौसने हजेरी लावली आहे. 23 मे रोजी या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, चंडीगड, दिल्ली, बिहार, झारखंड आदी राज्यांतही पाऊस सुरू आहे.

Tags: अरबी समुद्रउन्हाळापाऊसमहाराष्ट्रमान्सूनमुंबई
Previous Post

जुनाबाई वाघिणीचा पिच्छा करणाऱ्या रानकुत्र्यांची झाली पळता भुई….

Next Post

पुण्यातल्या सभेपूर्वी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा गनिमीकावा….

Next Post

पुण्यातल्या सभेपूर्वी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा गनिमीकावा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!