• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पर्यावरण रक्षणासाठी महावितरण सज्ज

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2021
in जळगाव, धुळे, महाराष्ट्र
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा) पर्यावरण रक्षणासाठी महावितरणनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. कागदी वीजबिलाऐवजी ग्राहकांना ई-मेल व एसएमएसवर बिल पाठवण्याची गो-ग्रीन योजना महावितरणने सुरू केलेली असून या योजनेत राज्यातील सुमारे सव्वादोन लाख तर खान्देशातील १० हजारांहून अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. या ग्राहकांना बिलात दरमहा १० रुपयांची सवलतही देण्यात येत आहे. इतर ग्राहकांनीही कागदी बिल नाकारून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा आणि योजनेच्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

छापील वीजबिलांसाठी मोठ्या प्रमाणावर कागद लागतो. हा कागद आणि पर्यायाने वृक्षतोड वाचावी या उदात्त हेतूने महावितरणने काही वर्षांपूर्वी गो-ग्रीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत छापील बिल नाकारून केवळ ई-बिल घेणाऱ्या ग्राहकास दरमहा ३ रुपये सवलत दिली जात असे. ग्राहकांचा या योजनेकडे कल वाढावा यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून ही सवलत दरमहा १० रुपये करण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यानंतर गेल्या अडीच वर्षांत गो-ग्रीन योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील २ लाख १९ हजार ८३७ ग्राहकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. खान्देशात १० हजार ८१ ग्राहकांनी गो ग्रीनसाठी नोंदणी केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ६५९६, धुळे जिल्ह्यातील २३२२ तर नंदुरबार जिल्ह्यातील ११६३ ग्राहकांचा समावेश आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील ‘गो-ग्रीन’ क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या https://consumerinfo.mahadiscom.in/gogreen.php या लिंकवर जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिल तयार झाल्यावर ते तातडीने ई-मेलद्वारे मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित ‘गो-ग्रीन’ सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Tags: dhulego greanjalgaonmaharastramsebnandurbarparyavaran din
Previous Post

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे – छ. संभाजी राजे

Next Post

लॉक – अनलॉकचा गोंधळ ओसरला, अखेर मध्यरात्री निर्णय

Next Post

लॉक - अनलॉकचा गोंधळ ओसरला, अखेर मध्यरात्री निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!