• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

तीन तालुक्यांमध्ये ७६६.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान; रावेर तालुक्याला सर्वाधिक फटका

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 2, 2022
in जळगाव
0
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
Spread the love

जळगाव, दिनांक १ (जिमाका) – जिल्ह्यातील रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील अवकाळी पावसासह वादळी वार्‍याच्या फटक्यामुळे सुमारे ७६६.५० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील पालकमंत्र्यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील रावेर, यावल व चोपडा तालुक्यात मंगळवार ३१ मे रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि वादळाचा मोठा फटका बसला. यामुळे केळीसह अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यात चोपडा तालुक्यातील ७ गावांमधील ७५ शेतकर्‍यांच्या ४८.७० हेक्टर जमीनीवरील पिकांची हानी झाली आहे. याचप्रमाणे यावल तालुक्यातील ३३ गावांमधील ३०४ शेतकर्‍यांच्या २४७.०० हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. रावेर तालुक्याला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या तालुक्यातील १५ गावांमधील ५७६ शेतकर्‍यांच्या ४७०.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

या अवकाळी पाऊस व वादीळी वार्‍यांमुळे चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील केळी पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. दरम्यान, या नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या नुकसानीचे महसूल व कृषी खात्यातील यंत्रणेने तातडीने पंचनामे करावे, यासाठी तात्काळ ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना निर्देश द्यावेत असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुचना दिल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.

Tags: #jalgaon rajmudra darpangulabrao patilraver
Previous Post

एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले ! आजपासून किती रुपयांनी मिळणार!

Next Post

धक्कादायक! राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना अज्ञात तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी….

Next Post

धक्कादायक! राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना अज्ञात तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!