• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा पाऊसाची शक्यता जास्त; वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 2, 2022
in कृषी
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | तीन दिवसांअगोदरच मान्सून केरळ मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर हवामान विभागाकडून पावसाचा दुसरा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

देशात जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पाऊस वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात जळगावसह १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊसाची शक्यता आहे. म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचा हा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिल्लीत झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केला. हवामानशास्त्र विभागाने याआधी 14 एप्रिलला पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढविण्यात आला असून, तो 103 टक्के करण्यात आला आहे. अर्थात, त्यामध्ये चार टक्के कमी-अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.दरम्यान, यंदा राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक,औरंगाबाद, लातूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात २ ते ५ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, काल उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात वादळीवाऱ्यामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.

Tags: जळगाव.पाऊसवादळी वाराशेती पिकाचे नुकसानहवामान खाते
Previous Post

कधी न पाहिलेले गुजरातमध्ये अनोखे लग्न; नक्की जाणून घ्या!

Next Post

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विविध पदांसाठी भरती ; इच्छुक उमेदवारांनी नक्की वाचा…..

Next Post

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विविध पदांसाठी भरती ; इच्छुक उमेदवारांनी नक्की वाचा.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!