• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुरुंगात असलेले अनिल देशमुखांनी कोर्टाकडे एक दिवसाचा जामीन का मागितला ?

सीबीआयने भ्रष्टाचार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयात 59 पानांचे आरोप पत्र दाखल केले आहे.

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 4, 2022
in राजकीय
0
तुरुंगात असलेले अनिल देशमुखांनी कोर्टाकडे एक दिवसाचा जामीन का मागितला ?
Spread the love

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगवास भोगत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाकडे एक दिवसाचा जामीन मागितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी शुक्रवारी येथील विशेष न्यायालयात धाव घेतली. अनिल देशमुख यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे.

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत राज्यसभा निवडणुकीचे कारण देत 10 जून रोजी एक दिवसाच्या जामिनावर मुक्तता करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे. अनिल देशमुख यांनी न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे की, कायमस्वरूपी आमदार असल्याने अर्जदार (म्हणजेच अनिल देशमुख) हा राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजचा सदस्य आहे.

न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले :-
न्यायालयाला सांगण्यात आले आहे की,अर्जदाराला आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि मतदान करायचे आहे. या अर्जात असे नमूद करण्यात आले आहे की, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तात मतदान विधानभवनाच्या आत होणार आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या एस्कॉर्टची कमतरता भासणार नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश के. के. पाटील यांनी शुक्रवारी ईडीला देशमुख यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे आणि त्याच बरोबर पुढील सुनावणी ६ जून रोजी ठेवली.

महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत अडकू शकतो ! :-

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी सात उमेदवार असल्याने प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे. भाजपने आपल्या बाजूने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल सुखदेवराव बोंडे आणि धनंजय महाडिक असे तीन उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. त्याचवेळी काँग्रेसने इम्रान प्रतापगढ़ी यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे.

Tags: #case#money loundringanil deshmukhedncp
Previous Post

धक्कादायक! 2 भिकाऱ्यांच्या अंगावर गरम पाणी ओतून दुकान मालकाने घेतला जीव.

Next Post

“काश्मीरमध्ये ९० चे दशक परत येत आहे” राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

Next Post
“काश्मीरमध्ये ९० चे दशक परत येत आहे” राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

"काश्मीरमध्ये ९० चे दशक परत येत आहे" राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!