• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 10, 2022
in जळगाव
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा
Spread the love

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिवस पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितित उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला . जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब ऍड. रविंद्र पाटिल यांच्या हस्ते सकाळी 10.10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला व उपस्थित सर्वांनी ध्वजवंदना देत राष्ट्रगीताचे गायन केले . पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटिल व जिल्हा बँकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले . देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात आपल्याला काम करायला मिळत आहे हे आपले भाग्य आहे .पक्ष स्थापनेपासुन ते आजवर फक्त 5 वर्षांचा अपवाद वगळता पक्ष कायम सत्तेत आहे याचे सर्व श्रेय पवार साहेब यांनी केलेले कार्य व त्यांच्या विचारसरणीला आहे . कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व पवार साहेबांची विचारधारा , कार्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी व जास्तीत जास्त जनहिताचे कार्य करावे म्हणजे जळगाव जिल्ह्यात देखील सर्व नगरपालिका , जिल्हा परिषद , महानगरपालिका ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असे मत त्यांनी मांडले . तद्नंतर केक कापुन सर्वांनी एकमेकांना पक्ष वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पक्षातील जेष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून स्वातंत्र्य चौक , नेहरू चौक , चौबे शाळा , चित्रा चौक , कोर्ट चौक या मार्गाने शहारातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली व रॅलीची सांगता राष्ट्रवादी कार्यालयासमोर झाली. सदर रॅलीत कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात जोरदार घोषणा देत आसमंत दणाणून सोडले , मोटरसायकल रॅलीत सुमारे 150 मोटरसायकल व 300 कार्यकर्ते सहभागी झाले .
सदर कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब ऍड. रवींद्र पाटिल , जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबरावजी देवकर , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश चिटणीस एजाज मलिक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटिल , विकास पवार , महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटिल , महिला महानगर अध्यक्षा मंगलाताई पाटिल , वाल्मिक पाटिल , रिकू चौधरी , अमोल कोल्हे , अरविंद मानकरी , मजहर पठाण , राजू मोरे , रवी देशमुख , अश्विनीताई देशमुख , कल्पिता पाटिल , ऍड. राजेश गोयर , दत्तात्रय सोनवणे , भगवान सोनवणे , सुशील शिंदे , सुनील माळी , अशोक सोनवणे , रमेश बाऱ्हे , अनिल पवार , अकिल पटेल , रहीम तडवी , जितेंद्र चांगरे , विशाल देशमुख , किरण राजपूत , नईम खाटिक , राहुल टोके , जितेंद्र बागरे , सूर्यकांत भामरे , राजू बाविस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वाय. एस. महाजन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रिकू चौधरी यांनी केले .

Tags: #anniversary#jalgaon rajmudra darpanncp jalgaonsharad pawar
Previous Post

गृह मंत्रालयात नोकरीची संधी ; 12वी पास या सह अनेक पदांसाठी नोकऱ्या

Next Post

गुंतवणुकीची योजना ; दररोज फक्त 200 रुपये वाचावा आणि 30 वर्षांनंतर करोडपती व्हा..

Next Post
गुंतवणुकीची योजना ; दररोज फक्त 200 रुपये वाचावा आणि 30 वर्षांनंतर करोडपती व्हा..

गुंतवणुकीची योजना ; दररोज फक्त 200 रुपये वाचावा आणि 30 वर्षांनंतर करोडपती व्हा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!