• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुत्रा चोर आणि भामट्यांवरच भुंकतो, मुंबई पावसावरून राजकीय शाब्दिक सरींचा जोर वाढला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 11, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) पहिल्या मान्सून पावसात मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे पोकळ ठरले असून मुंबई महापालिकेचे धाबे दणाणले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वे बंद करण्याची वेळ आली सोबतच साचलेले पाणी, खड्डे यांमुळे रस्त्यावरील वाहने तासनतास एकाच जागी स्थिर होती. दरम्यान भाजपाने यावरुन शिवसेनेवर जोरदार शाब्दिक सरी बरसवल्या. नालेसफाईच्या कंत्राटांमध्ये गेल्या पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी केला. दरम्यान या सर्व टीकेला उत्तर देताना महापौरांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधी पक्षाकडून मालाड इमारत दुर्घटनेमुळे आणि पावसातल्या महापालिकेच्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर टीका असल्याच्या प्रश्नावर बोलताना महापौर किशोरी पेंडणेकर यांनी, ‘भाजपाला वाट्टेल ते बरळण्याचा पूर्व अधिकार आहे, ते स्वप्नात आहेत म्हणून बरळत आहेत. त्यांनी भो भो करत राहावं,’ असं उत्तर दिलं होतं.

या विषयावर मौन सोडत अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून, “माननीय महौपार किशोरी पेडणेकर यांचं हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे,” असा टोला लगावला आहे. मान्सून सरीसोबत राजकीय शाब्दिक मान्सूनलाही जोर चढला आहे.

Tags: atul bhatkhalkarbhajapkishori pendnekarmonsoonmumbaishivsena
Previous Post

नियुक्तीच्या वादावर शिवसेनेत गटबाजीची कुऱ्हाड ..!

Next Post

आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोना सावटाखालीच होणार – उपमुख्यमंत्री

Next Post

आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोना सावटाखालीच होणार - उपमुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!