• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेहरून तलाव परिसरात दोन हजार वृक्षांचा मियावाकी प्रकल्प..

स्टेट बँक ऑफ इंडिया व मराठी प्रतिष्ठान चा संयुक्त उपक्रम..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 14, 2022
in जळगाव
0
मेहरून तलाव परिसरात दोन हजार वृक्षांचा मियावाकी प्रकल्प..
Spread the love

जळगाव-स्टेट बँक ऑफ इंडिया व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून मेहरूण तलावाच्या पूर्वेला विविध प्रकारच्या दोन हजार पाचशे वृक्षांची लागवड मियावाकी पद्धतीने करण्यात येणार असून याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासकीय कार्यालय, नाशिक येथील उपमहाप्रबंधक राजीव सौरव, क्षेत्रीय व्यवस्थापक अमित कुमार, मुख्य व्यवस्थापक शिरीष कोल्हे अरुण अटकालिकर, समृद्धी केमिकल्स ली. चे संचालक सुबोध चौधरी यांच्या उपस्थितीत आज सकाळी करण्यात आला.

मियावकी म्हणजे काय ?
जपानी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या पध्दतीला मियावकी असे म्हटले जाते.

मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड करतांना २ बाय २ फूट अंतरावर वृक्षलागवड केली जाते. त्यात झाडांची वाढ दहा पट जलद होते. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या झाडांच्या स्थानिक प्रजाती लावता येतात. नेहमीपेक्षा तीस पट घनदाट जंगल तयार होते. या झाडांमुळे ३० टक्क्यांपर्यंत कार्बनडाय ऑक्साइड वायू शोषून घेण्यास त्यामुळे मदत होते. दोन वर्षांनंतर झाडांची निगा घ्यावी लागत नाही. हे जंगल आवाज व धुलीकणास रोध निर्माण करते. या जंगलातून विविध पक्षी व फुलपाखरांना आश्रयस्थान निर्माण होते.
मराठी प्रतिष्ठान प्रथमच अशा प्रकारे वृक्षारोपण करीत असून प्रतिष्ठान ला स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय,जळगांव यांचे सहकार्य मिळत आहे.

मियावाकी वृक्ष लागवड शुभारंभ प्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे,सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर, मराठी प्रतिष्ठान चे विश्वस्त संध्या वाणी, अनुराधा रावेरकर, निलोफर देशपांडे, डॉ सविता नंदनवार, दीपक धांडे उपस्थित होते.

Tags: #jalgaon rajmudra darpan#tree plantationjalgaon
Previous Post

मोठी बातमी – शिंदे सरकार चे जनतेला गिफ्ट ; पेट्रोल डिझेल केले स्वस्त..

Next Post

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजन

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजन

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!