• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 24, 2022
in Uncategorized
0
४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे  प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती
Spread the love

जळगाव दि. २२ प्रतिनिधी :– चेन्नई (महाबलीपुरम्) येथे २८ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून व तमिळनाडू शासनाने पुरस्कृत केल्यामुळे या स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होत आहेत. या जगातील सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जळगावचे जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे फिडे पंच प्रवीण ठाकरे यांना सामना पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. असा बहुमान मिळवणारे जळगाव जिल्ह्यातील ते पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ ऑलंपियाड स्पर्धेचे यावेळचेे वैशिष्ट्य म्हणजे विक्रमी देशांचा सहभाग, यावेळी तब्बल १८७ देश या स्पर्धेत सहभागी होत असून १८८ संघ खुल्या गटात तर १६२ महिला संघ या सांघिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या व महिला गटात स्वतंत्रपणे स्पर्धा खेळविली जाणार असून स्विस् लिग पद्धतीने एकूण ११ फेऱ्यांअंती अंतिम विजेते संघ घोषित केले जातील. भारताकडून आपले सर्वोत्तम संघ यात सहभागी असून खुल्या व महिला या दोन्हीही गटांमध्ये भारतीय चमुंचा ‘ अ ‘ , ‘ ब ‘, व ‘ क ‘ असे अनुभुवी व तरुण वर्गांचा समावेश असलेले संघ उतरतील.
जगजेत्ता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनसह जगातील सर्वोत्तम १७५० बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व २०५ नियुक्त केलेले पंच मिळून जवळपास २२०० प्रतिनिधी या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व तामिळनाडू शासनाने केली आहे. एकूण नियुक्त केलेल्या २०५ आंतरराष्ट्रीय पंचापैकी ९० आंतरराष्ट्रीय पंच भारतातील आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंचांची निवड झाली आहे. प्रवीण ठाकरे हे गेली २० वर्षांपासून बुद्धिबळ संघटक, संयोजक, प्रशिक्षक व पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मानाचा ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पंच कमिटी चे सचिव म्हणून कार्यरत आहेत तर याचबरोबर विविध भूमिकेतून बुद्धिबळ क्षेत्राच्या वाढीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात.
या निवडीसाठी प्रवीण ठाकरे यांचे आखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या त्यांच्या यशासाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील, जैन स्पोर्ट्स चे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, नरेंद्र फिरोदिया, विनय बेळे, पी. बी. भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Tags: #jainchess
Previous Post

शेंदुर्णीत विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे भव्य मूक मोर्चा

Next Post

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

Next Post
उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!