• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संभाजीराजे आणि उदयनराजेंची पुण्यात भेट, मराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र येणार?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 14, 2021
in महाराष्ट्र
0
संभाजीराजे आणि उदयनराजेंची पुण्यात भेट, मराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र येणार?
Spread the love


(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा)
राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षीत असलेल्या संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट होत असून भेटीसाठी दोन्ही राजे कालच पुण्यात दाखल झाले होते. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी सर्व राजकीय नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी बऱ्याच उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आज अचानकपणे संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या भेटीची माहिती समोर आली आहे.

संभाजीराजे छत्रपती राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा असून १६ जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उदयनराजे भोसले हे संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार का, हेदेखील पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभरात फिरून अनेक अभ्यासक, तज्ज्ञ आणि प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतरही मराठा आरक्षणाचे गाडे फारसे पुढे सरकलेले नाही. त्यामुळे आता संभाजीराजे आणि उदयनराजे हे दोन राजे एकत्र येऊन सरकारवरील दबाव वाढवू शकतात, अशी शक्यता बोलून दाखविली जात आहे. मात्र, उदयनराजे भोसले नेमकी काय भूमिका घेतात यावर पुढल्या गोष्टी निश्चित होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आणखी एक भव्य मोर्चा काढण्याची तयारी सध्या सुरु आहे. यासाठी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. या तिघांच्या वेळा घेतल्यानंतर मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यास या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Tags: kolhapur maratha morchamaratha aarkshanpunesambhajiraje bhosleudayanraje bhosale
Previous Post

डोंगर कठोरा येथे एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Next Post

मनसेची महापालिका निवडणुकीची प्रचंड तयारी – बाळा नांदगावकर

Next Post
मनसेची महापालिका निवडणुकीची प्रचंड तयारी – बाळा नांदगावकर

मनसेची महापालिका निवडणुकीची प्रचंड तयारी - बाळा नांदगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!