• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात दुहेरी हत्याकांड, आईसह पाच वर्षांच्या मुलाची हत्या, पती बेपत्ता

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 16, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0
Spread the love

(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा) पुण्यात महिलेसह पाच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. पिकनिकसाठी गेलेल्या या कुटुंबाची हत्या झाल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावरील एका गावात सकाळी सात वाजता महिलेचा मृतदेह आढळला. तर तेथून ३५ किमी दूर कात्रज जवळ पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पती बेपत्ता असल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं असून पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया अबीद शेख आणि आयान यांची हत्या करण्यात आली आहे, तर पती आबिद बेपत्ता आहे. तो एका विमा कंपनीत ब्रांच मॅनेजर म्हणून कामास आहे. हे कुटुंब मूळचं मध्य प्रदेशातील असून पुण्यात लोहगावमधील ब्रुकलिन-प्राईड वर्ल्ड सिटीमध्ये वास्तव्यास होतं.

प्राथमिक तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने पिकनिकला जाण्यासाठी ११ जूनला कार भाड्याने घेतली होती. आबिद यांनी नंतर कारचा कालावधी वाढवून घेतला होता. सोमवारी रात्री ९ वाजता त्यांचं मध्य प्रदेशातील आपल्या कुटुंबासोबत बोलणं झालं होतं. आपण अर्ध्या तासात घरी पोहोचू असं यावेळी त्यांनी कुटुंबाला सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता. कार परत न आल्याने कार कंपनीचे कर्मचारी हाऊसिंग सोसायटीत पोहोचले होते. यादरम्यान आबिदच्या कुटुंबाने सोसायटीशी संपर्क साधला असताना कार कंपनीचे कर्मचारीही तिथे आले असल्याचं त्यांना कळालं. यानंतर त्यांनी पुण्यातील नातेवाईकाशी संपर्क साधत आबिद आणि इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान कार कंपनी कर्मचारी आणि नातेवाईकांनी जीपीसच्या सहाय्याने कारचा शोध घेतला असता सिटी प्राईड येथे पार्क केली असल्याचं आढळलं. रात्री सव्वा एक वाजता ही कार पार्क करण्यात आली होती. कारमध्ये रक्ताचे डाग दिसल्यानंतर त्यांना पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी हत्या झाल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयानची गळा दाबून हत्या करण्यात आली असून त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. तर आलियाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. दरम्यान कुटुंब सोमवारी हाऊसिंग सोसायटीत गेलं असता कार चुकीच्या जागी पार्क केल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता असंही पोलिसांनी सांगितले. पोलीस सध्या वेगवेगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही तपासत आहे. पुणे शहर, ग्रामीण पोलीस आणि क्राइम ब्रांच युनिट या हत्येचा तपास करत आहे. दरम्यान आबिद अद्याप बेपत्ता असून पोलीस शोध घेत आहेत.

Tags: crimecrime branchkatrajpunepune gramin policepune police
Previous Post

मराठा आरक्षण मूक मोर्चाला सुरुवात, फक्त लोकप्रतिनिधी मांडणार भूमीका

Next Post

ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वादाची स्थिती, गाजियाबाद येथे पहिला गुन्हा दाखल

Next Post
ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वादाची स्थिती, गाजियाबाद येथे पहिला गुन्हा दाखल

ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वादाची स्थिती, गाजियाबाद येथे पहिला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!