• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विनामूल्य रिक्षा प्रशिक्षण व लायसन्स-मनसे चा उपक्रम..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 31, 2022
in जळगाव
0
जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विनामूल्य रिक्षा प्रशिक्षण व लायसन्स-मनसे चा उपक्रम..
Spread the love

जळगांव-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व जळगांव जिल्हा निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या मार्गदर्शना नुसार जळगांव जिल्ह्यातील बेरोजगार तरुण व तरुणी यांना तीनचाकी रिक्षा प्रशिक्षण व लायसन्स विनामूल्य देणाच्या उपक्रमा ची नाव नोंदणी दि.१ ऑगस्ट २०२२ पासून १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरू करण्यात येणार असून प्रशिक्षणाचा शुभारंभ १६ ऑगस्ट रोजी जळगांव येथे उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कोरोना काळात अनेक तरुण तरुणी बेरोजगार झाले असून त्यांच्या उपजीविके करता त्यांना रिक्षा प्रशिक्षण देऊन लायसन्स बनवून देण्याची प्रक्रिया सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे करण्यात येईल.

शासकीय नोकर भरती नसल्यामुळे तरुणांची परिस्थिती दोलायमान आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा रोजगार निर्माण व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारचा उपक्रम राबवून बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे .

तसेच रिक्षा घेणाऱ्या तरुणांना बँका वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज मिळवून देणे याकरता सुद्धा मनसे मदत करणार आहे.

रिक्षा घेणाऱ्या व्यक्तीलाच विनामूल्य प्रशिक्षण व लायसन्स दिले जाईल.प्रवासी व माल वाहतूक या रिक्षा करीता योग्य ते व्यवसायिक मार्गदर्शन सुद्धा करण्यात येईल.

नांव नोंदणी मनसे च्या गणपती नगर येथील कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत करता येईल.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुण आणि तरुणींनी आपले नाव नोंदवावे व विनामूल्य प्रशिक्षण घ्यावे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी केले आहे.

कृपया आपले लोकप्रिय दैनिक/पोर्टल/या मध्ये बातमी प्रसिध्द करावी ही विनंती..

Tags: \#auto driver#auto#manse
Previous Post

सांस्कृतिक कार्यसंचलनायतर्फे बालगंधर्व स्मृतीदिनानिमित्त आयोजित नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन

Next Post

संजय राऊत यांना होणार अटक ! “राऊत यांना नवाब मलिककडे जावे लागेल”

Next Post
संजय राऊत यांना होणार अटक ! “राऊत यांना नवाब मलिककडे जावे लागेल”

संजय राऊत यांना होणार अटक ! "राऊत यांना नवाब मलिककडे जावे लागेल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!