• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंप्राळ्यात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

अग्निशमन सैनिक दिनानिमित्त कर्मचार्‍यांचा सत्कार

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोणत्याही आपत्ती निवारणप्रसंगी अतिशय धैर्याने व प्रशिक्षणाने आगीपासून जीव व मालमत्ता वाचविणारे तसेच यापासून होणार्‍या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे अग्निशमन सेवेचे सेवेकरी हे खर्‍या अर्थाने ‘सैनिक’च असतात. त्या अनुषंगाने शहरातील वाढत्या नागरी वस्त्यांचे क्षेत्र लक्षात घेता पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल, असे आश्वासन महापौर सौ.जयश्री महाजन यांनी आज दिले.

जागतिक अग्निशमन सैनिक दिनानिमित्त गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यातील महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या केंद्रात जाऊन केंद्रप्रमुख शशी बारी यांच्यासह विश्वजित गरडे, गिरीश खडके, तेजस जोशी, सय्यद नासीर अली, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, राजेश चौधरी, दिवाण इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे, संतोष तायडे आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपमहापौर मा.श्री.कुलभूषण पाटील हेही यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

महापौर सौ.जयश्री महाजन यांनी सुरूवातीला अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांप्रती ते देत असलेल्या उत्तम सेवेबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांच्या विविध सेवा-सुविधा देताना येणार्‍या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी कर्मचार्‍यांनी सद्यःस्थितीत या केंद्राकडे जुन्या 3 व नव्या 4 अशा एकूण 7 फायर फायटर गाड्या उपलब्ध असून, एक गाडी बंदावस्थेत आहे. सध्याची असलेली जागा केंद्रासाठी अपूर्ण पडत असल्याचे सांगत नव्या जागेत या केंद्राचे स्थलांतर केले जावे, अशी मागणी केली. तसेच उपकरण खरेदीसंदर्भातही चर्चा केली. त्यानंतर सौ.महाजन म्हणाल्या, की शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन तुमच्यावरील कामाचा ताण कमी करण्याच्या अनुषंगाने पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल. उपकरण खरेदीचा विषय या महिनाअखेर सोडविला जाईल. त्यासाठी 50 लाखांपर्यंत तरतूद केलेली आहे. खासदार मा.श्री.उन्मेष पाटील व आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या उपस्थितीत एमआयडीसी अधिकार्‍यांसमवेत डिसेंबर 2020 मध्ये बैठक झाली होती, त्यात एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे केंद्र एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय होऊन ते त्यांच्याकडे कार्यान्वित झाले आहे. तुमच्या केंद्रासाठी नव्या जागेचा शोध सुरू आहे, हा प्रश्नही लवकर निकाली काढला जाईल.

Tags: agnishman vibhag mahapalika jalgaonmahapalika jalgaonmahapour jayashree mahajanupmahapour kulbhushan patil
Previous Post

लसीकरण केंद्रावर पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केल्याशिवाय लस देऊ नये

Next Post

पंढरपूर फेरनिवडणुकीची राष्ट्रवादीची मागणी

Next Post

पंढरपूर फेरनिवडणुकीची राष्ट्रवादीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!