• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छ. संभाजीराजेंचा मूक आंदोलनानंतर मोठा निर्णय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 16, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
छ. संभाजीराजेंचा मूक आंदोलनानंतर मोठा निर्णय
Spread the love

 

(कोल्हापूर राजमुद्रा वृत्तसेवा) मराठा आरक्षणावर कोल्हापुरात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात मूक आंदोलन पार पडळे असून या आंदोलनात समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील,  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,  खासदार संजय मंडलिक,  खासदार धैर्यशील माने इत्यादी मंडळी उपस्थित होते.  दरम्यान या मूक आंदोलनानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचं आवाहन केलं होतं. संभाजीराजे यांनी आंदोलनानंतर बोलताना शुक्रवारी मुंबईत मराठा समन्वयकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केले आहे. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असताना आपणही एक पाऊल पुढे टाकू असं सांगत त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र यावेळी त्यांनी नाशिक, रायगड, अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ते म्हणाले की, “सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी मुंबईत चर्चेला येण्याची चांगली भूमिका घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि संबंधित मंत्री उपस्थित असतील. याचं मी स्वागत करतो. पण चर्चेला गेलो याचा अर्थ आम्ही समाधानी झालो असा नाही. ती चर्चा होणार आणि त्यातून काय निष्पन्न होणार हे आम्ही पाहणार. चेतावणी द्यायची नाही पण ठरलेले मोर्चा नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगड येथे होणारच आहेत”. दरम्यान जर राज्य सरकारने सगळे प्रश्न मार्गी लावले तर मूक आंदोलन नाही तर नाशिकला विजयोत्सव करु असंही त्यांनी जाहीर केले आहे.

Tags: chhatrapati sambhajirajedhairyashil manehasan mushrifkolhapurmuk aandolanprakash ambedkarsatej patil
Previous Post

“रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ माझ्याशी आहे” – अतुल भातखळकर

Next Post

डॉक्टरांचे अठरा जून रोजी देशव्यापी आंदोलन

Next Post
डॉक्टरांचे अठरा जून रोजी देशव्यापी आंदोलन

डॉक्टरांचे अठरा जून रोजी देशव्यापी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!