• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मांना NIA कडून अटक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 17, 2021
in क्राईम, महाराष्ट्र, शासकीय
0
मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मांना NIA कडून अटक
Spread the love

 

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गुरुवारी सकाळीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी NIA ने छापा टाकल्यानंतर आज दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. याच संदर्भात एनआयएनं प्रदीप शर्मा यांच्या घरावर सकाळीच छापा टाकला होता. तेव्हापासूच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असतांना आज दुपरी  त्यांना अटक करण्यात आले. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. ही कार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात एनआयएनं सविस्तर तपास केल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यामध्ये सचिन वाझे यांच्यासह मुंबई पोलिसातील दोन कर्मचारी आणि एक बुकी यांचा हात असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानुसार त्यांना एनआयएनं अटक केली. त्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात झालेली ही मोठी कारवाई ठरली आहे.

प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएनं सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ७ आणि ८ एप्रिल रोजी एनआयएनं प्रदीप शर्मांची चौकशी केली. यावेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी सचिन वाझे यांना देखील त्यांच्यासमोर आणून चौकशी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, यावेळी प्रदीप शर्मा यांच्या अटकेची शक्यता वर्तवली गेली असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. पण गुरुवारी प्रदीप शर्मांच्या घरावर छापा टाकल्यानंतर दुपारी एनआयएनं त्यांना अखेर अटक केली आहे.

 

Tags: maharashtramaharashtra policemansukh hiren hatya prakaranmukesh ambanimumbaiNIApradip sharmasachin waze
Previous Post

बी एच आर प्रकरणी जळगावात मोठे अटकसत्र

Next Post

डॉ. सुनील देशमुख लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

Next Post
डॉ. सुनील देशमुख लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

डॉ. सुनील देशमुख लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!