• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोन्याच्या भावात घसरण, चांदीही घसरली काय आहे आजचा नवीनतम दर ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 22, 2022
in Uncategorized
0
सोन्याच्या भावात घसरण, चांदीही घसरली काय आहे आजचा नवीनतम दर ?
Spread the love

राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – सोमवार, 22 ऑगस्ट रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळातच दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव घसरले. सकाळी 10.45 पर्यंत सोन्याचा भाव 162 रुपयांनी तर चांदीचा भाव 452 रुपयांनी घसरला होता. सोन्याचा भाव सध्या केवळ 52 हजार रुपयांच्या खाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत आज सलग पाचव्या सत्रात 0.31 टक्क्यांनी घसरून 51317 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आली आहे. ही एका महिन्यातील नीचांकी पातळी आहे. याआधी सोन्याचा व्यवहार 51,409 रुपयांच्या पातळीवर सुरू होता, मात्र मागणीअभावी लवकरच भाव खाली आले.

चांदीची चमकही कमी झाली :-
सोमवारी चांदीच्या दरातही घसरण आहे. MCXवर चांदीचा भाव 452 रुपयांनी घसरून 55,044 रुपये प्रति किलो झाला आहे. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार 55,237 रुपयांच्या पातळीवर सुरू झाला. परंतु काही काळानंतर मागील बंद किमतीपेक्षा 0.81 टक्क्यांनी घसरून व्यापार सुरू केला.

जागतिक बाजार स्थिती :-
जागतिक बाजारातही आज सोने लाल चिन्हावर व्यवहार करत असले तरी चांदी मात्र तेजीत आहे. सोमवारी, अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत $1,743.14 प्रति औंस होती, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.09 टक्के कमी आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 0.16 टक्क्यांनी वाढून 19.03 डॉलर प्रति औंस झाली आहे.

पुढे काय होणार ? :-
जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीवर अमेरिकन बाजाराचा लक्षणीय परिणाम होतो. यूएसमध्ये, जुलैमधील महागाईचा डेटा दिलासा देणारा दिसत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार भविष्यात सोने खरेदी करतील अशी शक्यता आहे. कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया सांगतात की, वर्षअखेरीस सोन्याचा भाव 54 हजारांच्या पुढे जाईल, पण भू-राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव 48 हजारांपर्यंत घसरेल.

Tags: #globle market#gold and silver rate today#gold rate today#IBJA MCX
Previous Post

मंदीमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या ! देशात पुन्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का ?

Next Post

‘ब्रेनगीता’ पुस्तकाचे पुण्यामध्ये उत्साहात प्रकाशन. आशिष पाटील यांच्या प्रयोगाची सगळीकडे चर्चा.

Next Post
‘ब्रेनगीता’ पुस्तकाचे पुण्यामध्ये उत्साहात प्रकाशन.   आशिष पाटील यांच्या प्रयोगाची सगळीकडे चर्चा.

‘ब्रेनगीता’ पुस्तकाचे पुण्यामध्ये उत्साहात प्रकाशन. आशिष पाटील यांच्या प्रयोगाची सगळीकडे चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!