• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक! प्रेयसीच्या शरीराचे 35 तुकडे केले; विल्हेवाट लावण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 15, 2022
in क्राईम
0
Spread the love

नवी दिल्ली: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुंबईतील 27 वर्षीय श्रध्दाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करीत फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आफताबचे घृणास्पद वास्तव समोर आले आहे. तो ज्या श्रद्धासोबत प्रेमाचे नाटक करत होता, तिचीच त्याने एवढ्या भीषण पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, त्याच काळात आफताब दुसऱ्या मुलीलाही डेट करत होता आणि त्याच घरात तिच्यासोबत सेलिब्रेशन करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील 26 वर्षीय तरुणी श्रद्धा वालकरचे आफताब पूनावालासोबत (वय 28) स्वप्ने पाहिली. त्याच्या प्रेमाखातर आपल्या कुटुंबाचा त्याग केला. दोघे दिल्लीत महरौलीत लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र आफताबने श्रद्धाची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केली. आफताबने सहा महिन्यांपूर्वी मेमध्ये श्रद्धाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रिजमध्ये लपवले. आफताब रोज रात्री मृतदेहाचे हे तुकडे पिशवीत भरून मेहरौलीच्या जंगलात फेकून यायचा.

क्राइम सिरीयल पाहून रचला हत्येचा कट

आफताबने सांगितले की, अमेरिकन टीव्ही क्राइम सिरीयल डेक्स्टरवरून मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. तत्पूर्वी, हे दोघेही मुंबईतच लिव्ह इनमध्ये राहात होते. श्रद्धाच्या कुटुंबीयांना हे माहित होताच त्यांनी विरोध केला. काही काळ दोघे मुंबईतील वसई आणि पालघरमध्ये राहिले. त्यानंतर श्रद्धा आणि आफताब अचानक मुंबई सोडून दिल्लीत आले.

मृतदेह लपवण्यासाठी फ्रीज खरेदी केला

पोलिसांनी सांगितले, की आफताब अन्य काही मुलींच्याही संपर्कात होता. याची माहिती श्रद्धाला मिळाली होती. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचा. आफताब आपल्याला धोका तर देणार नाही ना, असे श्रद्धाला वाटत होते. त्यामुळे ती लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. यातून सुटकेसाठी आफताबने श्रद्धाचा खून केला. श्रद्धाचा मृतदेह लपवण्यासाठी आफताबने 300 लिटरचा नवीन फ्रीज खरेदी केला होता. मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये यासाठी अगरबत्ती लावायचा आणि डिओ स्प्रे मारारायचा.

Tags: crimedelhi murderlove story
Previous Post

CISF Recruitment : बारावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, 69 हजारपर्यंत मिळेल पगार

Next Post

आयकर विभागाची मोठी कारवाई, अबू आझमींच्या 30 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी

Next Post

आयकर विभागाची मोठी कारवाई, अबू आझमींच्या 30 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!