• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपाल कोश्यारी यांची नियुक्ती रद्द करा, छावा मराठा युवा महासंघाच्यावतीने निषेध

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 21, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच ” छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळाचे आदर्श आहेत” असे बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल या पदावरून पदच्युत करत त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी किंवा त्यांनी स्वतःच पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत राष्ट्रपती यांचेकडे जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यामार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली. निवेदनात मम्हटले आहे की, यापूर्वी देखील त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू व मराठी लोकांविषयी असेच बेताल विधाने केलेले आहेत. एखाद्या राज्याचे राज्यपाल असणाऱ्या व्यक्तीने त्या राज्याची संस्कृती, अस्मिता व सांस्कृतिक बाबी, राष्ट्रपुरुष या सर्व विषयी विषयांची सविस्तर माहिती ठेवणे क्रम प्राप्त आहे. परंतु महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची किंचितही जाणीव नाही . तसेच ते जाणीवपूर्वक असे वादग्रस्त वक्तव्य करतात असा महाराष्ट्रातील जनतेला ठाम विश्वास आहे. राज्यपाल यांनी वारंवार राष्ट्रपुरुषांविषयी वादग्रस्त व आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील व देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करून त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केलेले आहे. यामुळेच राज्यपाल व महाराष्ट्र राज्यातील जनता यांच्यात अपेक्षित असणाऱ्या परस्पर विश्वासाच्या व सौहार्दाच्या नात्याला तळा गेलेला आहे किंबहुना असे नाते शिल्लक राहिलेले नाही. राज्यपाल या अत्यंत जबाबदारीच्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला जर आपल्या पदाची गरीमा राखता येत नसेल, तर ते पद सांभाळण्याची त्यांची कुवत नाही असे समजून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल या पदावरून पदच्युत करत त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी किंवा त्यांनी स्वतःच पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध

तसेच सदर निवेदनात भाजप चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील ” छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबास पाच वेळा माफीनामे लिहून दिले आहेत ” असे संतापजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांचा व वारंवार राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. सदरचे निवेदन देतांना छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, किरण ठाकूर, उज्वल पाटिल, भीमराव सोनवणे, ज्ञानेश्वर मिस्तरी, आकाश निकम , प्रांजल नेमाडे, कृष्णा जमदाडे, सागर मोतीराडे आदी उपस्थित होते.

Tags: #bhagatsing koshyarichatrapati shivaji maharaj
Previous Post

झोका घेतांना बसला गळ्याला फास, अमळनेरमध्ये मुलाचा मृत्यू

Next Post

गिरीश महाजनांचे वक्तव्य हलकट मनोवृत्तीचे : एकनाथराव खडसे

Next Post

गिरीश महाजनांचे वक्तव्य हलकट मनोवृत्तीचे : एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!