• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, 2500 हून अधिक जागा भरणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2022
in Uncategorized
0
Spread the love

नवी दिल्ली : पश्चिम मध्य रेल्वेने तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर 17 डिसेंबरपर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती मोहीम एकूण 2521 अप्रेंटिस रिक्त जागा भरण्यासाठी राबविण्यात येत आहे.

वयोमर्यादा :

पश्चिम मध्य रेल्वेमधील या रिक्त पदांसाठी 17 नोव्हेंबर 2022 रोजी उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अधिक वयाची सवलत लागू आहे.

शैक्षणिक पात्रता :

अर्जदारांनी संबंधित ट्रेडमध्ये किमान 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि आयटीआय (NCVT/SCVTशी संलग्न) असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया :

पश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी अर्जदार उमेदवारांनी इयत्ता दहावीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज शुल्क :

पश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in ला भेट द्यावी.
  • त्यानंतर होम पेजवर असलेल्या एन्गेजमेंट ऑफ अप्रेंटिस अॅक्टवर क्लिक करा.
  • अप्रेंटिस भरतीसाठी अप्लाय लिंकवर क्लिक करा आणि स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
  • आता तुमचा अर्ज भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत डाउनलोड करून प्रिंटआउट घ्यावी.

Tags: #Government job#railway bharati
Previous Post

जामनेरात मंत्री महाजनांचा निषेध, मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

भरधाव ट्रकची शासकीय वाहनाला धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

Next Post

भरधाव ट्रकची शासकीय वाहनाला धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!