• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव ट्रकची शासकीय वाहनाला धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज (दि.२३) पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. अमळनेर-धुळे या मार्गाने ते नाशिकला जाण्यासाठी (एमएच १९ डीव्ही ४१९९) क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले असलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले.

घटनास्थळी ग्रामस्थांनी केले मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, गटविकास अधिकार्‍याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचार्‍यांनी देखील अपघातस्थळ गाठले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेची पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील होता. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, हा अपघात धरणगाव तालुक्यात झाला असून एकनाथ चौधरी यांचा मृतदेह येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे.

Tags: accidentamalner
Previous Post

दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, 2500 हून अधिक जागा भरणार

Next Post

गौण खनिज माफियांची मुजोरी : तहसील कार्यालयातून भरदिवसा डंपर लांबवला

Next Post

गौण खनिज माफियांची मुजोरी : तहसील कार्यालयातून भरदिवसा डंपर लांबवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!