• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोल्ट्रीच्या आड सुरु होता भलताच उद्योग, पोलिसांनी धाड टाकताच उडाली खळबळ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2022
in क्राईम
0
Spread the love

मुक्ताईनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यात अचानकपणे केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. तालुक्यातील रूईखेडा येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने उध्दवस्त करत लाखो रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात बनावट दारूचे रॅकेट असल्याची चर्चा अनेकदा होत असते. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेडा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती स्टेट एक्साईजच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या अनुषंगाने पथक तयार करून काल मध्यरात्रीच्या सुमारास येथे छापा टाकण्यात आला.

लाखोंचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत सदर ठिकाणी देशी आणि विदेशी दारू बनावट पध्दतीत तयार करण्यात येत असल्याचे दिसून आले. बनावट दारू तयार करून याला बॉटलमध्ये पॅक करून यावर विविध कंपन्यांचे लेबल लाऊन विकले जात असल्याचे दिसून आले. या कारवाईत बनावट दारू तयार करणारे रसायन आणि अन्य सामग्री असा लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Tags: #muktaionagaravaidh darucrime news
Previous Post

भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

Next Post

मराठी हौशी नाट्य स्पर्धेचा पहिला नाट्यप्रयोग रद्द, २५ रोजीपासून प्राथमिक फेरीला सुरुवात

Next Post

मराठी हौशी नाट्य स्पर्धेचा पहिला नाट्यप्रयोग रद्द, २५ रोजीपासून प्राथमिक फेरीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!