• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतात बैल घुसल्याने झाला वाद, काकाने थेट पुतण्यालाच संपविले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 30, 2022
in क्राईम
0
Spread the love

पाचोरा : शेतात बैल घुसल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यात वाद होऊन हाणामारी झाली. या घटनेत जखमी पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वाडी (शेवाळे) येथे घडली. याबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी मयताच्या चुलत भावास ताब्यात घेतले आहे.

या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांकडुन प्राप्त माहिती अशी की, वाडी (शेवाळे) ता. पाचोरा येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेतजमीन शेजारी असल्याने पुनमचंद भावराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात शिरल्याचा राग येवुन प्रल्हाद भोसले याने त्याच्या नात्याने लागणारा नातु किरण पुनमचंद भोसले यांच्या पाठीत काठीने वार केला. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. यामुळे पुनमचंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगांव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.

न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी…

दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी शेतात बैल शिरल्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याने किरण पुनमचंद भोसले याने चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले व गणेश भोसले यांचे विरुध्द २७ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. यानंतर सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपुत यांनी वाडी येथे जावुन गणेश भोसले यास ताब्यात घेतले. यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गणेश भोसले ३० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू…

दरम्यान किरण भोसले याचे वडिल पुनमचंद भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुनमचंद भोसले यांचा मृत्यू झाल्याने प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करित आहेत.

Tags: crimemurderpachora
Previous Post

सावद्यात गो रक्षकांवर हल्ला, नऊ आरोपींना पोलिसांनी केली अटक

Next Post

चाळीसगाव हादरले! पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

Next Post

चाळीसगाव हादरले! पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!