• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेयसी व तीच्या मुलाचे धर्मांतर, आता प्रियकर म्हणतो तुझे 70 तुकडे करीन; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 2, 2022
in क्राईम, धुळे
0
Spread the love

धुळे : दिल्लीत श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे झाले, तू आमच्या विरोधात गेली तर तुझे ७० तुकडे करीन, अशी धमकी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिली. विशेष म्हणजे हे दोघे एकत्र राहात असून एका २४ वर्षीय तरुणीने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्याला सक्तीने धर्मांतर करायला लावले, पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आणि या तरुणाच्या पित्याने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असेही पीडिताने फिर्यादीत नमूद केले आहे.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या फिर्यादीनुसार, अर्शद सलीम मलिक नावाच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाने २९ नोव्हेंबर रोजी ही धमकी या तरुणीला दिली. जुलै २०२१ पासून ते दोघे एकत्र राहतात. त्याआधी चार एप्रिल २०१६ रोजी तिचा पहिला विवाह झाला. २०१७ मध्ये तिला मुलगा झाला. सन २०१९ मध्ये तिच्या पतीचे रस्ता अपघातात निधन झाले. त्यानंतर तिची एका अकॅडमी हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याची चित्रफीत बनवून तिला धमकावले. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यावर जुलै २०२१ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले. ते करताना या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले. अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटमध्ये नेले.

पिता पुत्राकडून तरुणीवर अत्याचार

उस्मानाबाद येथे अर्शदचा पिता सलीम बशीर मलिक याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चार महिन्यांनी अर्शदने तिला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. २६ ऑगस्ट २०२२ रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सलीम बशीर मलिककडून अनैसर्गिक अत्याचार होतच होते. दरम्यानच्या काळात अर्शदने तिचे धर्मांतर करवून घेतले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाची खतना करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तिला दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या बातम्यांची आठवण करून दिली. तिचे तर फक्त ३५ तुकडे केले गेले, तुझे आम्ही ७० तुकडे करू, अशा शब्दात त्याने धमकावले असे पीडिताने फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी अर्शद आणि सलीम या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Tags: dhule crimemahila atyachar
Previous Post

मुक्ताईनगरात सशस्त्र दरोडा, सराफा व्यावसायिकाचा 18 लाखांचा ऐवज लंपास

Next Post

भरधाव ट्रक झाडाला आदळला, चालकासह क्लिनर ठार

Next Post
भरधाव ट्रक झाडाला आदळला, चालकासह क्लिनर ठार

भरधाव ट्रक झाडाला आदळला, चालकासह क्लिनर ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!