• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप-शिंदे गटाचे ठरले; दुध संघाचे चेअरमन पदासाठी या नावावर शिक्कामोर्तब

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 15, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा दूध ससंघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला. यानंतर आता दूध संघाच्या चेअरमनपदी कुणाची वर्णी लागणार ?, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेअरमनपदासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दूध संघाच्या चेअरमनपदाची निवड 18 रोजी होणार आहे. दूध संघात भाजप- शिंदे गटाला स्पष्ट बहुमत असल्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील हे तीन नेते अंतिम निर्णय घेणार असून, त्यासाठी शनिवार, 17 रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. असे असलेतरी आमदार मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोघा मंत्र्यांनी दिला नकार

गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी आधीच चेअरमनपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे जाहीर केले आहे तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्रमकतेने निवडणूक लढली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना थेट त्यांच्याच मतदार संघात आव्हान देत निवडणूक जिंकून देखील दाखवल्याने आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकीपर्यंत दुध संघाचा विजयी जोश टिकवून ठेवत फायदा उचलण्याचा भाजप-शिंदे गट प्रयत्न करू शकतो.

भ्रष्टाचार, अनियमितेवर हल्लाबोल

आमदार चव्हाणांच्या नावाची जोरदार चर्चा
चेअरमनपदासाठी खडसेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांचा पराभव करणार्‍या मंगेश चव्हाणांचे नाव आघाडीवर आहे. कारण दुध संघातील भ्रष्टाचार, अनियमितेवर हल्लाबोल करून दुध संघ काबीज करणार्‍या भाजप-शिंदे गटाला भविष्यात याबाबत कायदेशीर लढाई लढायची आहे.

दूध संघाचा सखोल अभ्यास

दुध संघातील गैरव्यवहाराबाबत आमदार मंगेश चव्हाण यांचा सखोल अभ्यास आहे. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर गोष्टी आमदार चव्हाण हे चांगल्याप्रकारे हाताळतील, असा सर्वांना विश्वास आहे. त्यामुळे मंगेश चव्हाणांच्या नावावर सर्वांचे एकमत असल्याचे बोलले जात आहे.

Tags: #jalgaon doodh sanghjalgaon newsvikas doodh
Previous Post

वीज चोरट्यांविरोधात धडक मोहीम; रावेरमध्ये 22 जणांविरुध्द कारवाई

Next Post

स्वस्तात शेअर खरेदी करण्याची संधी! IRCTC चा 5 टक्के हिस्सा सरकार विकणार

Next Post

स्वस्तात शेअर खरेदी करण्याची संधी! IRCTC चा 5 टक्के हिस्सा सरकार विकणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!