जळगाव राजमुद्रा | जळगाव तालुक्यात अवैध्य वाढू व्यवसायला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे मात्र याकडे महसूल मधील अधिकारी दुर्लक्ष करीत नाही तर थेट सहभागी असल्याचा खळबळ जनक चर्चा सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढ्या रात्रीच्या वेळेत बातमी देण्याचा एकच कारण या क्षणाला गिरणा नदीपात्रात थेट जत्रेचे स्वरूप आले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदारांना या विषयी माहिती नसेल काय ? फार तर नवलच आहे. जळगाव प्रांताधिकारी म्हणून सध्या महेश सुरळकर व तहसीलदार म्हणून नामदेव पाटील कामकाज पाहत आहे.
अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रजेवर असताना गिरणा नदीपात्र मात्र वाळू माफी यांच्या भरोशावर सोडण्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वाळू वाहने क्षणाला नदीपात्रात उतरल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मात्र ही माहिती तहसीलदार,प्रांताधिकाऱ्यांना नसेल काय ? तर याचे उत्तर होय आहे, कारण अधिकारी पारदर्शक कार्याचा दावा करीत असताना नदी मात्र ओरबाडले जात आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू नदी पात्र वाळू माफिया लुटत आहे. पोलिसांतील अनेक जण बेकायदेशीर वाळू उपशात समाविष्ट असल्याची माहिती समजते आहे.
यामध्ये थेट पोलीस यंत्रणा तसेच महसुलातील अनेक मोरक्यांचा सीडीआर तपासल्यास अनेक गोप्यस्पोर्ट होणार आहे. मात्र हे गौप्यस्फोट तेव्हा समोर येतील जेव्हा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मुखवटे उघडे पडतील यासाठी यंत्रणेकडून संबंधितांच्या मोबाईलचे सीडीआर तपासणे गरजेचे आहे.