• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील समस्यांवरून आमदार राजुमामा भोळे आक्रमक, अधिवेशनात मांडली लक्षवेधी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 21, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : जळगाव शहरातील रस्ते, गाळेधारकांचा करार नुतनीकरण, घनकचरा प्रकल्प यासह शेतकऱ्यांच्या विषयावरून आमदार राजुमामा भोळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. याविषयावर त्यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.

जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या गाळ्यांचे महानगरपालिकेने गाळे धारकांना बजावलेले दंडात्मक बिले व मालमत्तावरील बोजा लावण्याच्या घोषणेमुळे महानगरपालिका प्रधासानाविरोधात गाळेधारक आक्रमक झाले आहे. ७ वर्षांचे थकीत भाडे गाळेधारकांनी काही प्रमाणात बिलाचे धनादेश जमा करून सुद्धा गाळे धारकांना अनधिकृत करण्याचे ठरविले आहे. त्यावर निर्णय घेऊन गाळेधारकांचे थकीत भाडे, भाडे पट्ट यांचे नूतनीकरण करण्यात यावे ₹, अशी मागणी आमदार भोळे यांनी केली आहे.

घनकचरा प्रकल्प सुरू करा

जळगाव शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तसेच रस्त्यांवर पाडलेला कचरा हा उचलला जात नाही. तो लवकरात लवकर कचरा भरून घेऊन घनकचरा प्रकल्प अजून पर्यंत बंद आहे, तरी घनकचरा प्रकल्प त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.

एमआयडीसी मधील समस्या सोडवा

जळगाव शहरातील एमआयडीसी मधील अनेक समस्यांवर त्वरित निर्णय घेण्यात यावा. स्मार्ट मॅग्नेट योजनेंतर्गत प्रकल्प मंजूर करतांना जळगाव जिल्ह्याला प्राधान्य देण्यात यावे. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागातील नागरिकांकडून रस्त्यांवर वारंवार तक्रारी प्राप्त होत असून त्यावर शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर रस्ते व्हावेत.

समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवा

मागील सरकारच्या ३३ महिन्यांच्या कार्यकाळात विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रातील भागातील अनेक विकास प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे १८७ टीएमसी पाणी अडविण्यात यावे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पाणी वळविल्याने खान्देशातील जिल्हे सुजलाम, सुफलाम होईल, अशी मागणी आमदार भोळे यांनी केली.

शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी होऊनही अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून ती लवकरात लवकर मिळावी. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न उद्भवत असुन शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी प्रकल्प व्हावा तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला चालना मिळण्यासाठी संबंधित विभागास आदेश द्यावेत. जळगाव जिल्ह्यात कापसाच्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होत असून कापसावर प्रक्रिया उद्योगला गती देण्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण अंमलात आणण्यात यावे असेही राजुमामा भोळे यांनी सांगितले.

Tags: jalgaon newsmla rajumama bhole
Previous Post

फक्त 2 हजारांत घरी न्या ‘इलेक्ट्रिक बुलेट’; एका चार्जमध्ये धावणार 150 किमी

Next Post

मोठी दुर्घटना! दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थी ठार तर अनेक जखमी

Next Post

मोठी दुर्घटना! दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थी ठार तर अनेक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!