• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यात बालविवाह, मुलीच्या तक्रारीवरून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 22, 2022
in क्राईम
0
चाळीसगाव तालुक्यात बालविवाह, मुलीच्या तक्रारीवरून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल
Spread the love

जळगाव : अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील लोंजे घडला असून या प्रकरणी पतीसह 11 संशयीतांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील रहिवासी असून सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे वास्तव्याला आहे. 15 जून 2021 रोजी दुपारी एक वाजता अल्पवयीन मुलीचा बालविवाह गोकुळ कैलास पवार यांच्याशी करून दिला. मात्र अल्पवयीन असताना व लग्नाबाबत काहीएक कळत नसल्याची माहित असताना देखील हा गुन्हा संशयीतांनी केल्याने पीडीतेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी चौकशी केली.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा

15 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी तथा पती गोकुळ कैलास पवार, चुलत सासरे अरुण फुलसिंग पवार, चुलत दीर सजन रतन पवार, सासरे कैलास फुलसिंग पवार, चुलत दीर ज्ञानेश्वर बाबुलाल पवार, दीर धनराज कैलास पवार, चुलत दीर रवींद्र युवराज पवार (सर्व रा. लोंजे, ता.चाळीसगाव), भाऊसाहेब रामलाल सोनवणे, अल्पवयीन मुलीची आई विमलबाई सोनवणे, सावत्र आजोबा अण्णा अभिमन मालिक, आजी कलाबाई अण्णा मलिक (चौघे रा.मालेगाव, जि.नाशिक) यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Tags: balvivahchalisgaoncrime news
Previous Post

जळगावात रावणावरुन तापले राजकारण, भाजप-शिवसेना आमनेसामने

Next Post

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

Next Post

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!