• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 29, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Spread the love

नागपूर : मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची भाषा भाजपने आधीपासून केली आहे. कर्नाटकचे भाजप मंत्र्यानेच हा डाव जगासमोर उघड केला. त्यांच्या एका वक्तव्यातून भाजपच्या पोटातलं ओठावर आलं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमाप्रश्नाचा ठराव झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावात सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळात उमटले. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांनी केली. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी ही भाजप नेत्यांनी केली आहे. मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव आहे. मुंबई भाजपच्या हातात गेली तर घात कसा करणार, हे समोर आले आहे. मुंबई आजपर्यंत कोणामुळे सुरक्षित आहे, हे मुंबईकरांना माहीत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भ्रष्ट मंत्र्यांना क्लिनचिट देणार का?

अधिवेशनात दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर आरोप झाले. सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला आहे. राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलने केली. परंतु अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, आरोप झाल्यानंतर क्लिनचिट देण्याचे काम करणार का हा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला.

RSS च्या कार्यालयावरही दावा करणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. “स्वत:मध्ये काही करण्याची धमक नाही याची कल्पना ज्याला असते, तो असे चोऱ्यामाऱ्या आणि दुसऱ्याचे ओरबाडण्याचे काम करतो. पक्ष चोरायचा, नेते चोरायचे हे असले काम तेच लोक करतात. काल मिंधे गट मुंबई पालिकेत पक्ष कार्यालयावर दावा करायला गेला. RSS च्या कार्यालयात गेलेत मग आता त्या कार्यालयावरही दावा करणार का? आता सरसंघचालक मोहन भागवतांनी कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावेत कारण, जे भेट घ्यायला आले होते ते कुठं लिंबू-मिरच्या-टाचण्या टाकून तर गेले नाहीत ना”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

Tags: bjpmumbaiuddhav thackeray
Previous Post

जिल्हा परिषदेतील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता! मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली निर्देश

Next Post

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Next Post
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!