• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव वाहनांनी दोघांना चिरडले; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला, तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 6, 2023
in जळगाव
0
भरधाव वाहनांनी दोघांना चिरडले; रुग्णवाहिकेच्या धडकेत महिला, तर ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार
Spread the love

जळगाव: जळगावात आज (दि. ६) दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे ठार झाले आहेत. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील ४८ वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाली आहे. तर जळगाव शहरातील खोटे नगराजवळ भरधाव आयशरने धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता कैलास पाटील (वय-४८) यांचे पती कैलास पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संगीताबाई पाटील या आज सकाळी सासू इंदुबाई यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येण्यासाठी निघाल्या होत्या. कुसुंबा गावातून येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिका क्रमांक (एमएच १९, सीवाय, ७०९१) ने जोरदार धडक दिली. या धडकेत संगीताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार

रावेर तालुक्यातील प्रशांत भागवत तायडे (वय ३०) आणि जयेश द्वारकानाथ पाटील (वय २३) हे दोघे मित्र शुक्रवारी ६ जानेवारी रोजी सकाळी रावेर तालुक्यातील गहुखेडा येथून दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीपी २३५५) बांभोरीकडे जाण्यासाठी निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास खोटे नगर जवळील वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गवर भरधाव आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय ८१६७)ने दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. तेवढ्यात समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २४३८) वाहनाखाली प्रशांत तायडे आल्याने त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने जागीच ठार झाला. तर मागे बसलेला त्याचा मित्र जयेश हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: accidentjalgaon news
Previous Post

रस्त्यांच्या कामांसाठी आंदोलन छेडणार, सूरज नारखेडेंचा बांधकाम विभागाला इशारा

Next Post

अखेर गिरीश महाजनांनी मागितली माफी, म्हणाले- आम्ही शिवरायांचे अनुयायी

Next Post

अखेर गिरीश महाजनांनी मागितली माफी, म्हणाले- आम्ही शिवरायांचे अनुयायी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!