• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील दुकान फोडणाऱ्या आरोपीस अटक; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील दुकान फोडणाऱ्या आरोपीस अटक; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई
Spread the love

जळगाव : जळगाव शहरातील चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमधील जय लहरी ट्रेडर्स दुकान फोडून ७३ हजारांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या तीन जणांना जिल्हापेठ पोलीसांनी भिलवाडी परिसरातून अटक केली आहे. यातील दोन संशयित आरोपी हे अल्पवयीन असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल आणि चोरी करतांना वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत नंदलाल रंगलानी (वय-५०) रा. साने गुरुजी कॉलनीच्या मागे, टेलीफोन नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंग येथे जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतीला लागणारे इलेक्ट्रिक मोटार यांचे दुकान फोडून सुमारे ७३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरी करतांना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. याप्रकरणी सोमवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांच्या पथकाने केली कारवाई

गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पवार यांच्याकडे देण्यात आला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोहेकॉ सलीम तडवी, गणेश पाटील, पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. समाधान पाटील, पो.कॉ. अमित मराठे, नरेंद्र दिवेकर, केतन सुर्यवंशी अशांनी कारवाई केली.

दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी

संशयित आरोपी विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे रा. पावर हाऊस, भिलवाडी जळगाव याला त्याच्या राहत्या परिसरातून अटक केली आहे. इतर दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. चोरीला गेलेला ७३ हजार रूपयांचे मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १९ सीजी ६१०५) असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील करीत आहे.

Tags: crimejalgaon news
Previous Post

गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

Next Post

एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता- मुख्यमंत्री शिंदेंची डायलॉगबाजी

Next Post
एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता- मुख्यमंत्री शिंदेंची डायलॉगबाजी

एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता- मुख्यमंत्री शिंदेंची डायलॉगबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!