• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोल येथील व्यापाऱ्याला मागितली खंडणी, दोघा पत्रकारांसह 8 जणांना अटक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 16, 2023
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : एरंडोल येथील प्रसिद्ध व्यापारी तथा ऑईल मिल चालकास लाखो रुपयांची खंडणी मागणा-या दोघा पत्रकारांसह एकुण 8 जणांना एरंडोल पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे. यात तिन महिलांचा समावेश असून दोघी अल्पवयीन असल्याची पोलिसांना शंका आहे. त्यामुळे तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

एरंडोल येथील प्रसिद्ध श्री बालाजी ऑईल मिल चालवणारे आनंद अनिल काबरे यांचे वडील अनिल गणपती काबरे यांना एक पुरुष आणि एक महिला अशा दोघांनी मिळून त्यांची सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल अशी धमकी दिली होती. त्यांच्याकडून सात ते आठ लाख  रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 13/2023 भा.द.वि.384, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा रचून केली कारवाई

या गुन्ह्यातील पुरुष व महिला 16 जानेवारी रोजी खंडणी मागण्यासाठी श्री बालाजी ऑईल मिल मधे येणार असल्याचे काबरे यांनी एरंडोल पोलिसांना कळवले होते. त्यानुसार श्री. बालाजी ऑईल मिल याठिकाणी पंचांसह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि गणेश अहिरे, पोलिस उप निरीक्षक शरद बागुल, पोहेकॉ अनिल पाटील, पोना मिलिंद कुमावत, पोना संदीप पाटील, पोना जुबेर खाटीक, महिला पोना ममता तडवी, होमगार्ड पीओ दिनेश पाटील आदींसह श्री. बालाजी ऑईल मिल परिसरात सापळा रचण्यात आला.

पळून जाणाऱ्या आरोपींना अटक

दोन महिला व दोन इसम हे खंडणी मागण्याकामी ऑईल मिलमधे आले. एक महिला व तीन पुरुष मिल कंपाऊंडच्या बाहेर थांबले. ऑईल मिलमध्ये आलेल्या महिलेने अनिल गणपती काबरे यांचेकडून एक लाख रुपये खंडणी घेतली. त्याचवेळी पंचासमक्ष दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने त्यांना लागलीच रंगेहाथ छापा टाकुन ताब्यात घेतले. छाप्याची चाहुल लागताच ऑईल मिलच्या बाहेर उभे असलेली एक महिला व तीन पुरुष हे दोन मोटर सायकलीने म्हसावद नाका मार्गे जळगावच्या दिशेने पळून जाऊ लागले. सपोनि गणेश अहिरे, पोना जुबेर खाटीक, महिला पोना ममता तडवी होमगार्ड पीओ दिनेश पाटील आदींनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना महामार्ग पोलीस केंद्र पाळधी व पाळधी दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार आदींच्या मदतीने पकडून ताब्यात घेतले.

पोलिसांनी याना केली अटक

शशिकांत कैलास सोनवणे (धंदा- किराणा दुकान, रा. प्लॉट नं. 228, द्वारका नगर, भुसावळ), सिद्धार्थ सुनिल सोनवणे (विद्यार्थी) (रा. झेडटीएस रोड, ताप्ती क्लब, भुसावळ), रुपाली राजु तायडे, रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ, मिलिंद प्रकाश बोदडे, धंदा- पत्रकार, रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा, गजानन आनंदा बोदडे (रा. कुलकर्णी प्लॉट धम्मनगर, भुसावळ), आकाश सुरेश बोदडे (धंदा- चालक, रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा) अशी पोलिसांच्या ताब्यातील आरोपींची नावे आहेत.

वेगवेगळ्या नावाने उकळली खंडणी

मिलिंद प्रकाश बोदडे (पत्रकार – न्युज 24 महाराष्ट्र) रा. तळणी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा याने यापूर्वी वेळोवेळी ऑईल मिल बाबत कारवाई करण्याबाबत वेगवेगळ्या नावाने सरकारी कार्यालयात अर्ज करुन अनिल गणपती काबरे यांच्याकडून साठ ते सत्तर हजार रुपयांची खंडणी उकळली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या खंडणीबाजांकडून खंडणीचे एक लाख रुपये रोख, 8 मोबाईल, 2 मोटर सायकल, 1 डिझायर कार असा एकुण 10 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पो.नि. ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गणेश अहिरे हे करत आहेत.

Tags: crime news
Previous Post

‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक बुथवर राबविणार, भाजपच्या बैठकीत निर्णय

Next Post

बीएचआर युटर्न : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या वर पुण्यात खंडणीची तक्रार ; सुरज झंवर यांनी दिली फिर्याद

Next Post

बीएचआर युटर्न : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या वर पुण्यात खंडणीची तक्रार ; सुरज झंवर यांनी दिली फिर्याद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!