• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठ्या भावाचे वर्षश्राध्द अन् लहान भावानं गमावला जीव, दुचाकीच्या अपघातात आतेभाऊ-मामेभाऊ ठार‎

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 17, 2023
in Uncategorized
0
Spread the love

वरणगाव : भरधाव दुचाकी बोहर्डी‎ (ता.भुसावळ) लगतच्या‎ उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकल्याने‎ मामेभाऊ व आतेभावाचा दुर्देवी‎ मृत्यू झाला. सूरज रामदास तांबे‎ (वय १५, रा.काहुरखेडे) आणि‎ सुनील विठ्ठल भालेराव (वय २०,‎ रा.वाघारी, ता.जामनेर) अशी‎ मृतांची नावे आहेत. यापैकी सूरज‎ याच्या मोठ्या भावाचे सोमवारी‎ वर्षश्राद्ध होते. याच दिवशी‎ कुटुंबीयांना दुसरा मुलगा गमवावा‎ लागला आहे.

रामदास तांबे यांचा मोठा मुलगा‎ गोविंदा याचा गेल्या वर्षी अकस्मात‎ मृत्यू झाला होता. त्याच्या‎ वर्षश्राद्धासाठी सोमवारी तांबे यांच्या‎ घरी काहुरखेडे येथे छोटेखानी‎ कार्यक्रम होता. हा कार्यक्रम‎ आटोपल्यानंतर रामदास तांबे यांचा‎ मुलगा सूरज तांबे (वय १५,‎ रा.काहुरखेडे) आणि भाचा सुनील‎ विठ्ठल भालेराव (वय २०,‎ रा.वाघारी ता.जामनेर) हे दोघे‎ मामेभाऊ व आतेभाऊ काहुरखेडे‎ येथून बोहर्डीकडे दुचाकीने जात‎ होते.

उपचारादरम्यान मृत्यू झाला

दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास‎ बोहर्डीजवळ त्यांची अनियंत्रित‎ झालेली दुचाकी उड्डाणपुलाच्या‎ भिंतीला धडकली. त्यात सूरज‎ तांबे याचा जागीच मृत्यू झाला. तर‎सुनील भालेराव हा गंभीर जखमी‎ झाला. त्याला जळगाव येथील‎ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.‎ पण, उपचारादरम्यान मृत्यू झाला.‎ मृत सूरज याचे शवविच्छेदन‎ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ.‎ क्षीतिजा हेंडवे यांनी केले. रात्री‎ उशिराने अंत्यसंस्कार झाले.‎

पिंपळकोठ्याजवळ दोन‎ ठार

नाशिककडे भरधाव‎ जाणाऱ्या मर्सिडीज कारने समोरून‎ दुचाकीला धडक दिली. या दोन‎ युवक जागीच ठार, तर एक गंभीर‎ जखमी झाला. पिंपळकोठा (ता. एरंडोल)‎ गावाजवळील महामार्गावर सोमवारी‎ सायंकाळी ६.३० वाजता हा अपघात‎ झाला. नितीन जामसिंग पाटील‎ (वय २५), घनश्याम भानुदास‎ बडगुजर अशी दुचाकीवरील दोन्ही‎ मृतांची नावे आहेत. तर नारायण‎ धनसिंग पाटील असे जखमीचे नाव‎ आहे.

Tags: accidentvarangaon news
Previous Post

अपघातातील मृताच्या वारसांना 50 लाखांची भरपाई: ट्रकने दिलेल्या धडकेत झाला होता मृत्यू

Next Post

अंगावर ट्रॅक्टर घातल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कारवाईसाठी मृतदेह आणला तहसील कार्यालयात

Next Post

अंगावर ट्रॅक्टर घातल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कारवाईसाठी मृतदेह आणला तहसील कार्यालयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!