• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक! सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळला, घातपातचा संशय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 19, 2023
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका बंद कंपनीच्या आवारात सुरक्षारक्षकाचा जळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामनगर येथील रहिवासी ईश्वर देवराम अहिरे (वय-६६) हे सुरक्षारक्षक म्हणून काम करून आपल्या परिवाराच उदरनिर्वाह करतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ समोरील बाजूस विक्रम प्लास्टिक ही बंद पडलेली कंपनी आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आणि वाळलेले गवत जळताना दिसून आले. सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांनी हे दृष्य पाहताच त्यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी लागलीच वरिष्ठांना माहिती देत त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले.

काय आहे नेमका प्रकार?

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर (वय-३०) यांनी खबर दिली आहे. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाने तपास सुरू आहे. याप्रसंगी फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीला सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहिरे यांना दारूचे व्यसन होते. रात्री थंडी असल्याने त्यांनी शेकोटी केली असावी आणि त्यात तोल जावून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज असल्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सांगितले.

Previous Post

सरकारी नोकरीची संधी; माझगाव डॉक शिपबिल्टर्स रिक्त जागांसाठी करणार भरती

Next Post

राखी सावंतला पोलिसांनी केली अटक, शार्लिन चोप्राचे प्रकरण भोवणार?

Next Post
राखी सावंतला पोलिसांनी केली अटक, शार्लिन चोप्राचे प्रकरण भोवणार?

राखी सावंतला पोलिसांनी केली अटक, शार्लिन चोप्राचे प्रकरण भोवणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!