• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रजासत्ताक दिनानिमित्त 901 पोलिसांना पोलीस पदक जाहीर; महाराष्ट्रातील 84 पोलिसांचा समावेश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 25, 2023
in Uncategorized
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त 901 पोलिसांना पोलीस पदक जाहीर; महाराष्ट्रातील 84 पोलिसांचा समावेश
Spread the love

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक, 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे.

पीआयबी कडून मिळालेल्या माहितीनुसार, 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केल्या जाणार आहे.

कर्तव्यनिष्ठेसाठी पोलीस पदक

शौर्यासाठी पोलीस पदक (PMG) जीवन आणि मालमत्ता वाचवण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी विशिष्ट शौर्याच्या आधारावर प्रदान केले जाते. पोलीस सेवेतील विशिष्ट विक्रमासाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) दिले जाते. आणि कर्तव्यनिष्ठेसाठी पोलीस पदक (PM) सन्मानित केले जाते.

महाराष्ट्राला एकूण 84 राष्ट्रपती पदके

महाराष्ट्र राज्यातील एकूण 84 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. यापैकी 42 जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, तिघांना विशेष सेवेसाठी आणि 39 जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी सन्मानीत करण्यात येणार आहे. राज्यातील तीन अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात येणार आहे. राज्य गुप्तवार्ता विभागातील पोलीस मुख्यालयालयातील सहआयुक्त सुनील कोल्हे, ओशिवारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे, ठाणे येथील वायरलेस विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप कन्नाळू यांचा त्यात समावेश आहे.

राष्ट्रपती शौर्य पदकप्राप्त अधिकारी-कर्मचारी

राष्ट्रपती शौर्य पदकांपैकी 36 पदके गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या आणि मरणोत्तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहेत. तर, किशोर आत्राम (पोलीस शिपाई, गडचिरोली), जगदेव मडावी (पोलीस हवालदार, गडचिरोली), आणि धनाजी होनमाने (पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली) या तिघांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदक देण्यात येणार आहे. तसेच गुणवत्तापूर्वक सेवेसाठी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

Tags: Police award
Previous Post

महाराष्ट्र हादरला! अंधश्रद्धेतून संपूर्ण परिवाराचे हत्याकांड, भीमा नदीत सापडले सात मृतदेह

Next Post

बनावट नोटा प्रकरणी धक्कादायक माहिती उघड: इतक्या लाखांच्या नोटा आणल्या चलनात

Next Post
साकेगावात सुरू होता धक्कादायक प्रकार, बनावट ग्राहक पाठवताच पोलिसही झाले हैराण

बनावट नोटा प्रकरणी धक्कादायक माहिती उघड: इतक्या लाखांच्या नोटा आणल्या चलनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!