• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लान! लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 25, 2023
in Uncategorized
0
भाजपचा मास्टरस्ट्रोक प्लान! लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार
Spread the love

नवी दिल्ली : 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपनेही आपली सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजप कुठलीही कमी ठेऊ इच्छित नाही. त्यामुळे भाजपपासून नेहमी लांब राहणारा अल्पसंख्याक समाज आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने मास्टर प्लॅन बनवला आहे.

निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष सामाजिक वोटबँक लक्षात घेऊन पुढील रणनीती तयार केली जाते. भाजपकडूनही सामाजिक समीकरण जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि बौद्ध यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचण्याचा कार्यक्रम राबवणार आहे.

मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार

एवढेच नाही तर भाजप अल्पसंख्याकबहुल लोकसभा मतदारसंघात स्कूटर यात्रा काढणार आहे. दिल्लीत होणाऱ्या अल्पसंख्याकांच्या परिषदेसाठी भाजपचीही मोठी योजना असून या परिषदेला पंतप्रधान मोदी संबोधित करू शकतात, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

मुस्लिम धर्मगुरूंना जोडण्याचा प्रयत्न

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आपल्या स्कूटर यात्रेत मुस्लिम धार्मिक नेत्यांचाही समावेश करू शकतो, ज्यांच्या रणनीतीवर पक्षात चर्चा होत आहे. भाजपच्या योजनेनुसार, भाजप प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 5000 मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना पक्षाशी जोडेल. एवढेच नाही तर मुस्लिम धर्मगुरूंना जोडून भाजप केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा प्रचार तळागाळापर्यंत नेणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात पोहोचण्याचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर भाजप अल्पसंख्याक स्नेहसंमेलन आयोजित करणार आहे.

60-70 लोकसभा मतदारसंघावर लक्ष

भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीसाठी 60-70 लोकसभा मतदारसंघ आधीच लक्ष्य केले आहेत. या सर्व अल्पसंख्याक बहुल लोकसभेच्या जागा आहेत, जेथे अल्पसंख्याक समुदाय बहुसंख्य भूमिकेत आहेत. या योजनेनुसार भाजप 60-70 लोकसभा मतदारसंघात सुफी, सुशिक्षित मुस्लिम, डॉक्टर, इंजिनिअर, विणकर, कारागीर, छोटे व्यापारी आणि उलेमा यांच्यात पकड निर्माण करेल आणि त्यांना पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्याची योजना आहे.

 

Tags: #PM narendra modibjp
Previous Post

प्रवाशाच्या बॅगमध्ये सापडले भलतेच पुस्तक, उघडून पाहताच पोलिसही चक्रावले

Next Post

तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार – बाबूसिंगजी महाराज

Next Post
तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार – बाबूसिंगजी महाराज

तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार - बाबूसिंगजी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!